उत्तर महाराष्ट्र गुन्हा नंदुरबार

नंदूरबार येथील युवकावर चाकू हल्ला

नंदुरबार –  येथील इम्रान खान सत्तार खान ऊर्फ निंबा ( वय 26 ) या युवकास ईस्राईल सलिम पिंजारी याने रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोटात चाकू मारला. त्यास पुढील वैद्यकीय उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, टिपू सुलतान चौक बागवान गल्ली मधील रहिवासी इम्रान खान यास त्याच परिसरातील रहिवासी ईस्राईल सलिम पिंजारी याने रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले.जखमी इम्रानची घरची स्थिती मध्यम असुन त्याची आई अपंग तर बहीण विधवा आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी इम्रानची विचारपूस केली. याप्रकरणी नंदुरबार पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान चाकू माारण्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

0