उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

काँग्रेसच्या जळगांव महानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेशाम चौधरी

जळगांव – येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॉ. राधेश्याम चौधरी यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या बाबत काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी तथा खा. के.सी. वेणू गोपाल यांनी कळविले आहे. यामुळे डॉ. राधेश्याम चौधरींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अ.भा.काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने जनरल सेक्रेटरी तथा खा. के.सी. वेणू गोपाल यांनी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील महानगर जिल्हाध्यक्ष यांची निवड जाहीर केली असून त्यानं नासिक विभागात नासिकला डॉ. तुषार शेवाळे तर जळगावला डॉ.राधेशाम चौधरी यांची निवड केली आहे. या निवडीने डॉ. राधेशाम चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

1+