उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

महाराजाने केली शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी ; पोलिसात फिर्याद

  • स्वामी नारायण मंदिर, सुरत येथील धक्कादायक प्रकार उघडकिस
  • पीडितेचे कार्यकारी दंडाधिकार्‍यांकडे प्रतिज्ञापत्र ; पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
 
  • दिव्य प्रकाश स्वामीचा ‘तो’ मुख्य आश्रयदाता कोण?
कारवाईच्या भीतीने या प्रकरणातील दिव्य प्रकाश स्वामीची सुरतच्या मंदिरातून हकालपट्टी केली मात्र संस्थानशी संबंधीत जळगावातील एका नामांकित ट्रॅव्हल्सच्या संचालकाने या महाभाग स्वामीला आश्रय देण्यामागील गौडबंगाल काय आहे. असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच हा ट्रॅव्हल्सचा संचालकच या सर्व प्रकरणाचा सुत्रधार असल्याचे बोलले जात असून या संचालकाच्या सुरत-अहमदाबाद वारी मागील रहस्य देखील आगामी काळात उलगडण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या संपुर्ण रॅकेटचा छडा पोलिसांनी लावण्याची गरज आहे. तेव्हाच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार समोर येणार आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी संबंधीत टॅ्रव्हल्स चालक आपली सर्व आर्थिक शक्ती पणाला लावून प्रयत्न करीत आहे.
  • या सर्व गैर प्रकरणाशी संबंधीत ऑडिओ व व्हीडिओ क्लीप दै.बातमीदारकडे उपलब्ध आहेत.
जळगाव / विशेष प्रतिनिधी
समाजात आत्मशांती व मनशांतीसाठी विविध संप्रदाय व साधू संतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. व त्याच बरोबर या साधुसंत व त्यातील तथाकथीत महाराजांच्या प्रणयलिला व महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक कथा उघडकिस येतांना दिसून येत आहे. अशीच एक घटना श्री स्वामी नारायण मंदिरातील सुरतच्या दिव्यप्रकाश स्वामीने (मुळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी) एका शिक्षक महिलेला सुरत येथे बोलवून शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणातून व्यथीत होऊन पिडीत महिलेने दि. 23 जानेवारी 2019 रोजी कार्यकारी दंडाधिकारी जळगांव याचे समक्ष स्वतः हजर राहून प्रतिज्ञापत्र केले. त्यानंतर दोेंडाइचा पोलिस स्टेशन येथे 25 जानेवारी 2019 रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. एव्हढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी दोन आठवड्यानंतरही गुन्हा दाखल करून घेतलेला नसल्याने दोन आठवड्यांच्या कालावधीत पीडित महिलेवर दबाव आणून तिला आर्थिक आमिष दाखवून, दहशतीने तिच्याकडून दिव्यप्रकाश स्वामी विरोधात तक्रार नसल्याचे लेखी घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या लेखी प्रकरणात दोंडाईचा पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार प्रमोद चौधरी यांच्यासह पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोंडाईचा तालुक्यातील एक महिला शिक्षिका ही पार्टटाईम मार्केटींगचा व्यवसाय करीत होती. हा व्यवसाय वृध्दीसाठी तिने व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक सह इतर सोशल मिडियाची मदत घेतली होती. याच माध्यमातून या तथाकथीत अध्यात्मिकतेचा बुरखा पांघरुन दिव्यप्रकाश स्वामीने या पिडीत महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपल्या जाळ्यात अडकविण्यात काही अंशी सफलही झाला.  हळुहळू सोशल मिडियाच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत चक्क दोन-चार दिवसातच श्री स्वामी नारायण मंदिर सुरत येथे येण्याबाबत तगादा लावित शरीर सुखाची मागणी केली व तेथे आल्यावर मंदिरातील रुममध्ये सर्व व्यवस्था करतो तु कसलीही भिती बाळगू नकोस माझ्या सोबत माझे पाच ते सहा साथीदार आहेत असा गळ घातला.
एवढ्यावर न थांबता दिव्यप्रकाश रोज अश्‍लिल संदेश व व्हॅटस्अपच्या माध्यमातून यौन शोषण व शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. या लिंगपिसाट स्वामी दिव्य प्रकाशच्या या आगळ्या वेगळ्या रुपाने संबंधीत महिला सुरुवातीला गोंधळली व विवाहित असल्याने पती व परिवारातील मंडळींना हा प्रकार कशा पध्दतीने सांगावा या विवंचनेत तीने अनेक दिवस हा प्रकार सहन केला. मात्र संबंधीत थोतांडबाज साधुने या प्रकारात दिवसागणिक वाढ केली. त्याच्या सोबत अजून तेथील त्याचे साथीदारी यात सामिल आहेत. या प्रकाराने ती कमालिची वैतागली आणि ओळखीतल्या सामाजिक कार्यकर्ते व परिवाराला घडल्या प्रकाराबाबत विश्‍वासात घेवून अशी संबंधीत महिलेने या ढोंगी साधू व त्याच्या पाच ते सहा साथिदारांविरोधात दि. 23 जानेवारी 2019 रोजी कार्यकारी दंडाधिकारी याचे समक्ष स्वतः हजर राहून प्रतिज्ञापत्र केले. त्यानंतर दोेंडाइचा पोलिस स्टेशन येथे 25 जानेवारी 2019 रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत संबंधीत स्वामी नारायण मंदिरातील कुकर्माचा पर्दाफाश केलेला आहे. तिने फिर्यादीत दिलेल्या म्हटले आहे की. संबंधीत साधू संगनमत करुन आपली वासना व शारीरिक संबंधाची इच्छा पुर्ण करुन भागविण्यासाठी अनेक मुलींना भ्रमणध्वनी व सोशल मिडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून व्हाईस रेकॉडींग व कॉलिंगद्वारा अनेक प्रकारचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत व तसाच प्रकार माझ्याबाबतीत देखील घडला आहे. सुरत येथे येण्याची मागणी व त्या पाठोपाठ प्रत्यक्ष शारीरिक सुखाची मागणी या मागे हे सर्व मंदिरातील रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप तिने केला आहेे.
संबंधीत ढोंगी साधू हे आर्थिक दृष्ट्या प्रबळ, खुनशी, आडदांड, क्रुर निर्दयी, राक्षस व विकृत प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून मला व माझ्या परिवाराच्या जिवीतास व मालमत्तेस धोका आहे. व प्रसंगी मला निर्दयीपणे ठारही मारु शकतात. असेही फिर्यादीत म्हटले आहे. या क्रृरकर्मी ढोंगी साधुंविरुध्द तातडीने कायदेशीर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी. मला व माझ्या परिवारास पोलीस संरक्षण मिळावे असे फिर्यादीद्वारे संबंधीत शिक्षिकेने मागणी केली आहे.
4+