आरोग्य जळगांव

फैजपूर– फैजपूर शहरातील मिल्लतनगर कब्रस्थान भिंती लगतच्या गटारीची साफसफाई अभावी सांडपाणी गटारींच्या वर येऊन रहिवाशांच्या घरांजवळ जमा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे ओरड पुढे आली असल्याने ही समस्या मार्गी लावण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे
             फैजपूर शहरातील मिल्लतनगर मधील कब्रस्थानच्या भिंती लगत ऑइल मिल मागील गट नंबर ५५८ मधील या गटारचे काम सन २०१६ मध्ये करण्यात आले ही बनवितांना योग्य अशा नियोजन व योग्य तांत्रिक दृष्टया काम न करण्यात आल्याने पाच वर्षांपासून या गटारीत सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे याविषयी पालिका प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतर सुध्दा या गटारीतील सांडपाण्याचा योग्य निचरा अभावी अध्यापही ही समस्यां कायम आहे तसेच पर्याय म्हणून गेल्या अडीच तीन वर्षांपूर्वी खोळवा व मुरूम टाकून या गटारीची लेव्हल करण्यासाठी प्रयत्न केले गेले शिवाय ही गटार बुजण्यात येऊन पाईप टाकण्यात आले मुळातच ही गटार चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने अनेक प्रयत्न पालिकेचे फॉल गेल्याने या गटारीतील सांडपाणी निचरा अभावी समस्या कायम आहे त्यामुळे पालिका प्रशासन सुद्धा या समस्येविषयी हतबल झाली आहे गेल्या पाच वर्षांपासून या गटारी तील सांडपाण्याचा योग्य निचरा अभावी अध्यापही ही समस्यां कायम आहे आता या गटारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने मंगळवारी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना निवेदन दिले आहे गट नंबर ५५८ मधील ही गटार काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी येत नसल्याने पाणी तुंबत असून गटारी मधील घाण पाणी आमच्या घराजवळ जमा होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे गेल्या पाच वर्षांपासून हा त्रास आम्ही सहन करत आहे वेळोवेळी याबाबत वारंवार पालिकेला तोंडी व लेखी तक्रारी दिल्या आहेत आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष व कानाडोळा करतात व जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर  गट नंबर ५५८ मधील रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत

0