उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

पोस्ट खात्यातर्फे मंगळ ग्रह मंदिराचे चित्र असलेल्या विशेष पाकिटाचे प्रकाशन

अमळनेर( प्रतिनिधी) मंगळग्रह मंदिराच्या जिर्णोद्धारास 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय पोस्ट खात्यातर्फे मंदिराचे चित्र असलेल्या विशेष पाकिटाचे प्रकाशन पोस्ट खात्याचे औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्तर जनरल व्ही एस जयशंकर व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर जळगाव जिल्हा डाक अधीक्षक राजेश रनाळकर, डी वाय एस पी राजेंद्र ससाणे , मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष दिगंबर महाले हे हजर होते प्रास्ताविक करताना महाले म्हणाले की, खान्देशातुन मंगळग्रह मंदिराला हा सन्मान मिळाला ही भाग्याची गोष्ट आहे , व्ही एम जयशंकर म्हणाले की मंगळ देव हा लग्न मोडणारा आहे असा गैरसमज व अंधश्रद्धा पसरली होती मात्र येथे आल्यावर समजले की मंगळ देव साऱ्यांचे मंगल करणारा देव आहे. मंदिर व अमळनेरच्या पोस्ट कार्यालयाचा कारभार पाहून आंनद वाटला गेल्या एक वर्षांपासून या विशेष पाकिटासाठी प्रयत्न सुरू होते. जिल्हा डाक अधीक्षक रनाळकर म्हणाले की, या पाकिटाची किंमत 15 रुपये असून याची विक्री फक्त महिनाभर असेल मात्र हा ऐतिहासिक ठेवा असेल, त्यांनी पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी पो. नि. अनिल बडगुजर,रमेश (बापू)पवार सचिव एस बी बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम,खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव,गोटू बडगुजर,तुषार पाटील, सुशील भदाणे,एम ए पाटील,भास्कर चौधरी,आर जे पाटील,उमाकांत हिरे,राहुल बहिरम, तसेच पोस्ट कर्मचारी राजू ठाकूर, विजू ठाकूर,व तालुक्यातील नागरिक हजर होते.

0