उत्तर महाराष्ट्र जळगांव

सात तास विजेचा पुरवठा खंडित झाल्याने भुसावळकर घामाघूम

भुसावळ  प्रतिनिधी :- शहरातील तापीनगर सबस्टेशनवर जोडणी असलेल्या दोन फिडरवरील वीजपुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला. महावितरणने मान्सूनपूर्व व्यवस्थापन म्हणून झाडांची छाटणी तसेच तापीनगर भागातील विजेचा ट्रान्सफार्मर बदलल्याने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल सात तास वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे भुसावळातील अनेक भागातील रहिवासी घामाघूम झाले.
शहरातील तापीनगर सबस्टेशनवर जोडणी असलेल्या न्यायालय फिडरवर महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व झाडांच्या छाटणीचे काम पूर्ण केले. या कामासाठी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही एबी स्विचची डागडूजीला वेळ लागल्याने वीजपुरवठा नियोजनापेक्षा एक तास अर्थात दोन वाजता सुरळीत झाला. न्यायालय फिडरवर येणारा न्यायालय परिसर, जळगावरोड भाग, सतारे भाग, मामाजी टॉकीज, भारतनगर, महात्मा फुले नगर, म्युनिसीपल पार्क भाग आदी भागात वीजपुरवठा खंडित होता. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरातच आहेत, याच काळात वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना उकाड्यात थांबवे लागले. तर महावितरणने तापीनगर फिडरवरील वीजपुरवठा करणारा ट्रान्सफार्मर बदलल्याचेही काम पूर्ण केले. यामुळे यावलरोडचा दोन्ही भाग, राहूल नगर, साईचंद्र नगर, तापीनगर, हिंदू हौसिंग सोसायटी, तापीरोड ते थेट दगडी पूलापर्यंतचा भागातील वीजपुरवठा सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यान खंडित होता. महावितरण कंपनीने हे कामे अत्यावश्यक व आगामी काळात शहरवासीयांना सेवा देण्यासाठी करणे गरजेचे होते, यामुळे मान्सूनपूर्व व्यवस्थापन म्हणून ते पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले.

0