उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

मुस्लिम बांधवांनी घरातच थांबून ईदची नमाज अदा करावी – अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके

भुसावळ प्रतिनिधी :-  रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी घरातच थांबून ईदची नमाज अदा करावी, कोणीही बाहेर सामूहिकरित्या जमू नये, एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमू नये, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी केले.
रमजान ईदच्या पाश्र्वभूमीवर मुस्लिमा समाज बांधव व मौलवींच्या आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.खडका रोडवरील हिरा मॅरेज हॉलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीला आलेल्यांमध्ये योग्य ते फिजीकल डिस्टन्सिंग ठेवत सर्वांना बसविण्यात आले होते. यावेळी हिरा हॉलमध्ये मोठया प्रमाणावर मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती. पोलिस निरीक्षक दिलिप भागवत म्हणाले कि, ईद असल्याने सार्वजनिक ठिकाणी कोणीही गर्दी करू नये. गोपनीय विभागाचे हवालदार नंदू सोनवणे, सचिन पोळ आदी उपस्थित होते. अप्पर पोलिस अधीक्षक नवटके यांनी सांगितले की, शहरात सुध्दा कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हात पसरले आहे, यामुळे कोरोना संसर्गाला घालवायचे असेल तर कोणीही गर्दी करू नका, एकत्र जमू नका, रमजान ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरूनच नमाज पठण करावी, कोणीही बाहेर येऊ नये. सर्वांनी सहकार्य करावे, रमजान ईद ही हा मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण आहे. आतापर्यंत सर्वांनी केलेले सहकार्य महत्वाचे राहीले आहे, आताही त्याच प्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले.

0