उत्तर महाराष्ट्र जळगांव

प्रायोगिक तत्वावर बस चालविल्या जाणार :- आ.संजय सावकारे

भुसावळ प्रतिनिधी :- येथील नहाटा चौफुली समोर कित्येक वर्षापासून बस स्थानक सुरू करण्यासाठी आ. संजय सावकारे पाठवपुरावा करीत असून दि. 15 जून 2019 रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सकाळी 10:00 वाजेच्या दरम्यान प्रायोगिक तत्वावर लांब जाणाऱ्या बस लवकरच सुरू करण्यात येणार असून बस स्थानकाच्या भिंतीच्या वॉल कंपाऊंडचे उदघाटन करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पूर्वीच्या काळी ही जागा चांभार कुंडाची असल्याने व कॉलेज समोर सुरू असल्याने बस स्थानक कॉलेज समोर सुरू केल्यास होणाऱ्या अलाऊन्स मेन्ट मुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार यामुळे हे प्रकरण कित्येक वर्षांपासून प्रलंबित होते. यासाठी पुष्कळ अडचणी आल्या पण भुसावळ तालुक्याचे आ. संजय सावकारे यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. वारंवार मंत्रालयात प्रश्न धरून त्याचा पाठपुरावा करून आज रोजा बस स्थानक त्या जागेत सुरू करण्यासाठी वॉल कंपाऊंडच्या भिंतीचे उदघाटन आ. संजय सावकारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.450 मिटर जागेत प्रायोगिक तत्वावर दोन महिन्या नंतर पहिली बस सोडण्यात येणार आहे. बस स्थानक सुरू करण्यासाठी आधीही(बीओटी) तत्वावर परवानगी मिळाली होती. चौपदरीकरणाच्या कामात वाढ झाल्याने सहापदरी रोड व ओव्हर ब्रिज तयार होत असल्यामुळे जागा बस स्थानकाची त्यात गेल्यामुळे त्या ठिकाणी जागा ही कमी पडण्याची शक्यता असल्या मुळे आधी लांब जाणाऱ्या बसेस प्रायोगिक तत्वावर (ट्रायल) सोडण्यात येणार आहे. नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्या नंतर मंत्रालयातून परवानगी घेऊन कायम स्वरूपी केले जाणार आहे.जिल्ह्यातील बसेस आधीच्या बस स्थानका वरूनच सोडण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी जिल्ह्यातील बसेस रेल्वे स्टेशन परिसरातून सोडल्या जातील. अशी माहिती आ.संजय सावकारे यांनी दिली.प्रमुख उपस्थित म्हणून भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डाॅ.सुनिल नेवे सर.नगराध्यक्ष  रमणभाऊ भोळे माजी उपनगराध्यक्ष   युवराजभाऊ लोणारी भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे,नगरसेवक  पिंटूभाऊ ठाकूर, अॅड. बौधराज चौधरी. अमोलभाऊ इंगळे माजी नगराध्यक्ष  विजय मोतीराम चौधरी, दिनेश नेमाडे, सुमित बऱ्हाटेे, प्रा.प्रशांत पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

0