मुंबई राजकीय

घाटकोपर विभागातील नाले सफाईकडे मनपा अधिकार्‍यांचे जाणुनबूजून दुर्लक्ष

घाटकोपर (सचिन बुटाला) –  येथील सामाजीक कार्यकर्ते, रिपब्लिकन विकास अघाडीचे अध्यक्ष मिलींद रायगावकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना सांगितले, आमच्या घाटकोपर पुर्व/पश्चिम विभागात मान्सुनपुर्वेची कामे ठेकेदार व कंत्राटदार यांच्या कडून अयोग्य पध्दतीने केली जातात कामे करण्याकरिता अप्रशिक्षीत कामगार जसे फुटपाथ वर रहाणारे, दारु पिणारे, बाल कामगार,वयोवृध्द, महिला यांचा वापर करण्यात येतो या वेळी या कामगारांना हँडग्लोज, जँकेट, बुट तसेच आवश्यक साहित्य सुध्दा दिले गेलेले नाही. यांना कामांचा अनुभव नसल्यामुळे आमच्या प्रभागात कामे व्यवस्थित झालेली नाहीत दरवर्षी पाऊस आला की नाले, गटारे तुंबण्याच्या घटना घडतात, रहदारीचे रस्ते पाण्याखाली जातात, परिसरात पाणी तुंबल्यामुळे डासांचा प्रद्रुभाव वाढुन रोगराई पसरते , अतिवृष्टीच्या काळात तर महानगरपालिकेची आप्तकालीन योजना कुचकामी ठरते.
मिलींद रायगावकर यांनी असे आरोप केले आहेत की संबधित मनपा अधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात तरी या सर्व कामांची सखोल चौकशी करुन संबधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकुन, यांचा बिले थांबविण्यात यावीत यांना पाठिशी घालणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी.
या कामांवर योग्य अधिकार्यांनी जातीने लक्ष देऊन कामांची पहाणी करावी जेणे करून घाटकोपरचे नागरिक रोगराई व अडचणीमुक्त होतील.

0