गुन्हा जळगांव

ग.स. सोसायटीतील खात्यातून 50 लाखांचा अपहार

सुनिल सूर्यवंशींसह किरण पाटलांवर अपसंपदेचा गुन्हा दाखल

जळगाव –  गैरमार्गांनी मिळवलेल्या रकमेची उलाढाल जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत ( ग. स. सोसायटी) बेकायदेशीरपणे उघडलेल्या खात्यातून केल्यानंतर 50 लाख रूपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून या सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी सुनिल सूर्यवंशींसह विभागीय अधिकारी किरण पाटलांवर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या फिर्यादीवरून चौकशीनंतर हा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

सुनिल सूर्यवंशी हे सरकारी नोकर असून ते जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे अध्यक्ष असताना त्यांनी या संस्थेचे विभागीय अधिकारी किरण पाटील यांच्याशी संगनमत करून किरण पाटील यांच्या नावे बनावट खाते उघडले व नंतर त्यावरून अष्टचक्र ठेवीत अपसंपादीत बेहिशोबी 50 लाख रुपये ठेवले नंतर व्याजासह सदर रक्कम बनावट दस्तऐवज तयार करून काढून घेतली या घोटाळ्यात सूनील सूर्यवंशी यांना किरण पाटील यांनी यांनी सहाय्य केले म्हणुन त्यांचेविरूद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधिक्षक जी.एम.ठाकुर पुढील तपास करीत आहेत.

0