क्रिडा जळगांव

आज पासून जळगावी महिलांच्या फुटबॉल महायुद्धास सुरवात

जळगाव जिल्हा संघ घोषित
 आंतरजिल्हा राज्यस्तरीय खुल्या गटातील महिला फुटबॉल स्पर्धेला आज बुधवार २० जून पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात होत असून यात महाराष्ट्र राज्यातील एकूण चोवीस जिल्ह्यांचा समावेश असून पाचशे महिला खेळाडू यात सहभागी होत आहे
 *जिल्हा संघ निवड घोषित* जळगाव जिल्हा महिलांचा संघ सुद्धा आज सचिव फारुक शेख यांनी अध्यक्ष सुरेश दादा जैन यांच्या संमतीने उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अस्मिता पाटील  व जफर शेख यांच्या उपस्थितीत घोषित केला त्यावेळी कार्यकारणीचे सहसचिव  प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, अब्दुल मोहसिन, मनोज सुरवाडे यांची उपस्थिती होती
*निवड झालेले खेळाडू*
गुंजा विश्वकर्मा ( कर्णधार) रोहिणी बारी  (उपकर्णधार)  दिव्या पाटील,  युगा नवल , अंशिता गायकवाड,  ईशा पाटील , कुंतला सपकाळे ,रबाब जवारी ,श्रद्धा सुरळकर, मोनू घुले, शीतल पाटील ,रोहिणी सोनवणे, जया इंद्रकुमार ,मोनू उईके, आम्रपाली बागुल, यशश्री देशमुख, जयश्री काळे ,अंजली जाधव, प्रांजल बोंडे व प्राची वैद्य संघ प्रशिक्षक म्हणून जळगावचे राहील अहेमद तर संघ व्यवस्थापक म्हणून मोसेस चारल्स सेंट अलंयसेस भुसावसल  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
*उद्घाटन समारंभ*
 या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता महापौर सीमाताई भोळे, माजी मंत्री सुरेश दादा जैन,  सौ अंजली बाविस्कर,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान,वअंजली पाटील, एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी  यांच्या उपस्थित होत आहे.
जळगावकर नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहून महाराष्ट्र राज्यातील मुलींना प्रेरणा द्यावी असे आव्हान जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे  डॉ अस्मिता पाटील,जफर शेख,मो आबिद, फारूक शेख, मनोज सुरवाडे,शेखर देशमुख,प्रो डॉ अनिता कोल्हे,अब्दुल मोहसीन,इम्तियाज शेख,ताहेर शेख यांनी केले आहे
*आज होणारे सामने*
 ■ अहमदनगर विरुद्ध वर्धा ■जळगाव विरुद्ध ठाणे
■ वाशिम विरुद्ध लातूर
■सातारा विरुद्ध बुलढाणा
■ यवतमाळ विरुद्ध गोंदिया ■भंडारा विरुद्ध सांगली
 ■नागपूर विरुद्ध धुळे
0