उत्तर महाराष्ट्र जळगांव

पांझरा नदीची दयनीय अवस्था

पिंपळनेर (प्रतिनिधी) आपल्या पांझरा नदीची दयनीय अवस्था झाली आहे व *पांझरेच्या उगमापासून ते संगमा पर्यंत अतिक्रमण ,सांडपाणी आणि कचऱ्यामुळे नदी किनारचा परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे.* आपल्या पांझरेला तिचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी *“पांझराकाठ बचाव समिती”* आता पुढे येत आहे.या चळवळीत आपलाही उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.नदीत कचरा फेकू नका,नदीचे सौंदर्य आणि आपले भविष्य टिकावे म्हणून आम्ही विविध स्तरांवर काम करत आहोत.याचाच एक भाग म्हणजे याच महिन्यात येत्या शनिवारी म्हणजेच *दिनांक २२ जून २०१९ ला सकाळी ९:०० वाजता सामोडे चौफुली ते पिंपळनेर बस स्टँड या मार्गावर विद्यानंद हायस्कूलच्या विध्यार्थ्यांद्वारे आणि दिनांक २४ जून २०१६ रोजी आ.मा.पाटील विद्यालयातील विध्यार्थ्या यांच्या मार्फत मानवी साखळी द्वारे पांझरा नदी स्वच्छ ठेवण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.* तरी सर्व निसर्गप्रेमी,मध्यम प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे हि विनंती.वेळी नदी या विषयावर ,,,प्रा.राम पेटारे याचे मार्गदर्शन लाभणार आहे.

0