ठाणे मुंबई

फेरिवाले व अतिक्रमण यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त कधी लक्ष देणार…

ठाणे  – गेल्या काही दिवसापासुन ठाणे महानगर पालिकेत फेरिवाल्यांचा विषय गाजत आहे. ठाणे महानगर पालिकेतील काही नगरसेवकांनी महानगर पालिकेतील सहायक आयुक्त हप्ते घेऊन फेरिवाल्यांचा कारवाई आड येत असल्याची तक्रार केली होती यावर तात्काळ ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जयस्वाल यांनी सर्व प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांची बैठक घेऊन यावर प्रभाग समिती स्तरावर येथील अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाई चा अहवाल मागितला आहे व फेरीवाल्यांवर कारवाई चे आदेश दिले आहेत.

      ठाणे महानगर पालिकेपेक्षाही जास्त प्रमाणात फेरिवाल्यांचा त्रास कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना होत आहे, पण या बाबत येथील नगरसेवक या विषयी काही बोलायला तयार नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात आहे.येथील  रेल्वे स्टेशन परिसरात व पादचारी पुलावर (स्कायवॉक) फेरीवाल्यांनी एक प्रकारे अधिकृत अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. यांच्या विरुध्द सामाजीक कार्यकर्ते, आमदार, पत्रकार यांनी बर्याच वेळा आवाज उठविला पण कडोमपा चे अधिकारी तेवढ्या पुरती कारवाई केल्याचा आव आणतात पण प्रत्यक्षात कोणतीच ठोस कारवाई करत नाहीत,तर यातील काही फेरिवाले गुन्हेगार प्रवृतीचे आहेत हे पण सिध्द झाले आहे, असे काही गुन्हेगार प्रवृतीच्या फेरिवाले गर्दिच्या वेळी महिला व आबालवृध्द याच्याशी उध्दट वर्तन करतात,या फेरी वाल्यांमुळे चालणे जिकरीचे होते चालले आहे, तसेच ट्रफिक समस्या पण निर्माण होत आहे.

तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दित बहुतेक ठिकाणी फुटपाथ किंवा समोरची मोकळी जागा दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, गँरेज, शोरुम यांनी शेड उभारुन व सामान, गाड्या ठेऊन अतिक्रमण केले आहे बाकी मोकळ्या जागांचा फेरिवाल्यांनी ताबा घेतला आहे.
टिटवाळा स्टेशन ते गणपती मंदिर परिसर, शहाड, योगीधाम परिसर, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, दुर्गाडी परिसर, विठ्ठलवाडी स्टेशन पुर्व, कोळसेवाडी, चक्कीनाका, लोकग्राम, टाटा पॉवर, टिळक चौक, ठाकुर्ली स्टेशन पुर्व, रामनगर, विष्णुनगर, इत्यादी परिसरात जवळ जवळ सर्व कडोमपा च्या हद्दित सर्व मोक्याच्या ठिकाणी फेरिवाल्यांचे अतिक्रमण आहे.

कडोमपा चे अधिकारी सर्व गोष्टी माहिती असुन तक्रारी नंतर सुध्दा कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. त्या मूळे अशी शंका येते की ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या महानगर पालिकेतील सहायक आयुक्तांवर जसे आरोप केले तसाच प्रकार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी व सहायक आयुक्तांच्या बाबतीत तर नाही ना ? तरी कडोमपा चे आयुक्त गोंविद बोडके साहेबांनी जातीने लक्ष घालुन प्रभाग समित्यांच्या अधिकारी व सहायक आयुक्त यांना ठोस कारवाई करण्याचे आदेश देऊन नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी नगरिकांकडून होत आहे.

0