आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

गस्तीवर असणाऱ्या एमआयडीसी पोलिसांना हिंजवडी दरोड्यातील आरोपी गवसला ! निबोल दरोड्याशी आरोपीचा संबंध असल्याचा संशय ; गावठी पिस्तूल हस्तगत

जळगाव ;- येथील एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्ती घालत असताना एमआयडीसी भागात टायटन कंपनीजवळ संशयितरित्या फिरत असलेल्या टारूला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता तो हिंजवडी पेट्रोल पंप  दरोड्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा निबोलदरोडा  प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून त्याची विचारपूस करण्यात येत आहे. दरम्यान त्याच्याकडून ४० हजार किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी कि , पोना विजय पाटील यांना मिळालेल्या खबरीवरून पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजकुमार ससाणे , सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी, पोना विभाज्य पाटील ,पोना मनोज सुरवाडे , पोकॉ मुजफ्फर काझी, पोकॉ किशोर पाटील आदींच्या पथकाने आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना एमआयडिसीतील व्ही सेक्टर मधील टायटन कंपनीजवळ रामेश्वर शेषमल राठोड वय (२५)रा. आयटीआय कॉलनी ,जामनेर हा गावठी पिस्तूलसह संशयितरित्या फिरताना आढळून आला . त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो हिंजवडी येथील दरोड्यातील फरार आरोपी असल्याचे चौकशीत समोर आले . तसेच त्याच्याजवळ गावठी बनावट पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले आहेत . या आरोपीची माहिती हिंजवडी पोलिसांना देण्यात आली आहे . पोकॉ प्रवीण मांडोळे  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर आर्म ऍक्टचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी करीत आहे.
हिंजवडी पेट्रोल पंप  दरोड्यातील फरार आरोपी
रामेश्वर राठोड हा पुण्यातील हिंजवडी आयटीआय नगरातील मारुती रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या सराईत टोळींच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून यात चार जणांना घातक शस्त्रासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते .  शुभम मणिलाल जैन वय 21 राहणार गिरजा कॉलनी ,जामनेर , प्रकाश किशोर मोरे वय २७ रा. गणेश वाडी जामनेर , विशाल अरुण वाघ वय 22 रा मोर खेडा जामनेर ,  प्रतीक शिवाजी बारी वय 20 रा . आयटीआय कॉलनी जामनेर या चार जणांना हिंजवडी पोलिसांनी नुकतीच अटक केली होती . मात्र यातील प्रशांत पाटील ,रामेश्वर राठोड रा. जामनेर हे दोघे दुचाकीवरून फरार झाले होते.  मात्र यातील रामेशवर राठोड याला पहाटे ४ वाजेच्या सुमारास एमआयडीसीच्या गस्ती पथकाने अटक केली असून संशयित रामेश्वर राठोड हा निंबोल दरोडा प्रकरणाशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे . याबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे.

0