आंतरराष्ट्रीय

रुग्णालया बाहेर डॅश बोर्ड वर या खाटाची माहिती प्रसिद्ध करा – पालिका आयुक्तांची खाजगी रुग्णालयाना आदेश
खाजगी रुग्णालायातील बिलावर पालिकेच्या फ्लाईग स्कॉडचे लक्ष

कल्याण : कल्याण डोंबिवलीत खाजगी रुग्णालयाकडून जादा बिले आकारण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी ची दखल घेत पालिकेने फ्लाईग स्कॉड तैनात केले आहेत .हे स्कॉड खाजगी रुग्णलयाना अचानक भेटी देत बिले पडताळत आहेत तसेच खाजगी रुग्णालयासाठी 2 दिवसांपूर्वी आदेश काढत खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा पालिकेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून या खाटा भरल्यानंतरच रुग्णालयांना 20 टक्के खाटा वापरता येतील रुग्णालया बाहेर डॅश बोर्ड वर या खाटाची माहिती नियमित पणे प्रसिद्ध करण्याचे पालिका आयुक्तांनी दिले आहेत .त्यामुळे खाजगी रुग्णालयाच्या मनमनीला चाप बसेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे
           कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात करोना रुग्णाकडून वारेमाप बिल वसूल केले जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने बिले तपासण्यासाठी फ्लाईंग स्क्वाड तैनात केले आहे .  या स्क्वाड द्वारे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याबरोबरच  दिवसाला 4 ते 5 रुग्णालयामध्ये सरप्राईज व्हिजिट केली जात आहे या व्हिजिट मध्ये रुग्णांना आकारल्या जाणाऱ्या बिलाची तपासणी केली जात असून रुग्णालयांना शासकीय दरा प्रमाणेच उपचार खर्च घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .याखेरीज खाजगी रुग्णालयासाठी 2 दिवसांपूर्वी आदेश काढत खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा पालिकेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून या खाटा भरल्यानंतरच रुग्णालयांना 20 टक्के खाटा वापरता येतील रुग्णालया बाहेर डॅश बोर्ड वर या खाटाची माहिती नियमित पणे प्रसिद्ध करण्याचे तसेच पोस्टर वर देखील खाटांच्या उपलब्धते बाबत माहिती देण्याचे  आदेश रुग्णालयांना देण्यात आले आहेत अशा प्रकारे  रुग्णाकडून अतिरिक्त बिल वसूल केले जाणार नाही याची काळजी पालिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले .

0