उत्तर महाराष्ट्र जळगांव

जळगावच्या शेरा चौकातील बोगस डॉक्टरचा पर्दाफाश !

मूळव्याधीच्या इलाजासाठी गेला आणि कॅन्सरचा आजार लावून मरणपंथाला रुग्ण पोहचला
ऑपरेशनसाठी लागणारे अद्ययावत सर्जरी साहित्य जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव;- मूळव्याधीच्या इलाजासाठी गेला आणि कॅन्सरचा आजार लावून मरणपंथाला पोहचला अशी गत एका रुग्णाची झाल्याने मूळव्याध क्लिनिक नावाने जळगावातील शेरा चौकात दुकानदारी थाटणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश आज दुपारी करण्यात आला . पोलिसांनी बोगस डॉक्टरला अटक केली असून एमडी सर्जनला लागणारे अद्यावत आपरेशनचे साहित्य त्या बोगस डॉक्टरकडे आढळून आले आहेत . यामुळे खळबळ उडाली आहे .
याबाबत माहिती अशी कि, शेरा चौकात जाकीर सत्तार खाटीक रा. नागदुली ता. एरंडोल येथील रहिवाशी असून मेहरूण परिसरातील शेरा चौकात या बोगस डॉक्टरने मूळव्याध क्लिनिक सुरु केले होते . त्याच्याकडे एक मूळव्याधीचा रुग्ण इलाजासाठी आला होता . त्याला कित्येक दिवस औषदोपचार व ऑपरेशन करून शेवटी इलाज भलताच झाला . त्या रुग्णाला कँसरची लागण झाली असून आता हा रुग्ण शेवटच्या घटका मोजत आहे . याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यावरून आज दुपारी १ वाजेच्या सुमारास पीएसआय योगेश शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण आणि इतर सहकाऱयांनी आज शेरा चौकात जाऊन झाडाझडती घेतली असता त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र खोटे असून तो बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले . त्याच्या क्लिनिकमधून ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याविरुद्ध रुग्ण आणि फिर्यादी जितेंद्र रामा धनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
एमआयडीसीचे पीएसआय योगेश शिंदे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील,विस्तार अधिकारी चुनीलाल मोतीराया ,पीएसआय विशाल वाठोरे , पीएसआय माधुरी बोरसे, पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील,संदीप पाटील , मिलिंद पाटील

0