उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

वन अधिकाऱ्यांसाठी शस्त्र हाताळणे व गोळीबाराचे प्रशिक्षण

जळगाव –  – जळगाव वनविभागातील सर्व सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना जंगल संरक्षणकामी वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास शस्त्र हाताळता यावे. याकरीता जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दि. वा. पगार यांचे निर्देशानुसार शस्त्र हाताळणे व गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन कुंभारखोरी, जळगाव येथील पोलिस शुटींग रेंजवर  मदनसिंग चव्हाण, राखीव पो. उप निरिक्षक, पोलिस मुख्यालय, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रशिक्षणास जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. पगार यांचे सह वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील, आर. एस. पवार,  बी. एस. पाटील,  डी. जी. पवार, एस. ए. पाटील,  डी. एस. देसाई, ए. व्ही. चव्हाण, आर. बच्छाव व वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन, भुसावळ आर. जी. राणे, हे उपस्थित होते. या प्रशिक्षणाकरिता समन्वयक म्हणून आर. जी. राणे, वनपिरक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन, भुसावळ स्थित जळगाव यांनी कामकाज पाहिले.

0