आंतरराष्ट्रीय

भुसावळातील फसवणूक करणाऱ्या राम अवतरला अटक

भुसावळ प्रतिनिधी :- येथील रहिवासी मलकापूर गुन्ह्यातील फसवणूक करणाऱ्या आरोपी नामे राम अवतार गौरीशंकर परदेशी हा शनीमंदिर वार्डात आठवडे बाजार भागात भुसावळमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथील गुन्ह्यातील भाग 5 गुरंन-457/ 2018  भा द वि कलम- 420, 464, 465, 468,471 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.यातील आरोपी नामे राम अवतार गौरीशंकर परदेशी रा.शनीमंदिर भुसावळ असल्याचे समजले वरून आरोपी हा भुसावळ शहरात आठवले बाजार भागात आल्याची गुप्त बातमी वरून त्यास बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
कर्मचाऱ्यांनी सापडा रचून आरोपीस पडकले असून त्यास पोलीस निरीक्षक श्री सुभाष दुधाळ नेम मलकापूर शहर पो स्टे यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाही मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन राठोड,पोलिस निरीक्षक देविदास पवार यांचा मार्गदर्शनखाली स फै.तस्लिम पठाण, पो कॉ विकास सातदिवे,परदेशी केली.

0