जळगांव शिक्षण

ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर एरंडोल शाळेचे एस.एस.सी.परीक्षेत घवघवीत यश निकाल 91.11%. सर्वोदय मा, विद्यालय खडके बु चा निकाल94टक्के . न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीचा 100% निकाल. *शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल चा निकाल*

ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर एरंडोल शाळेचे एस.एस.सी.परीक्षेत घवघवीत यश निकाल 91.11%
प्रतिनिधी – एरंडोल येथील ग्रामीण उन्नती संचलित माध्यमिक विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.शाळेचा निकाल 91.11 टक्के लागला असुन या परीक्षेत कु.अनुष्का सचिन विसपुते 87.80 टक्के गूण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.वनिता मच्छिंद्र पाटील 87. 60 द्वितीय क्रमांक तसेचा कु. हर्षदा संजय पाटील 84.80 गूण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सदर शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन रमेश विसपुते तसेच मानदसचिव किशोर काळकर व सर्व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे.

सर्वोदय मा, विद्यालय खडके बु चा निकाल94टक्के .
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील खडके बु .येथील सर्वोदय मा, विद्यालय खडके बु शाळेचा निकाल,94 टक्के लागला असून सर्वोदय शाळेतून कु नेहा किशोर धुमाळ हिने 84:80गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. व पूनम गणेश पवार हिने 83:80गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने तर दिव्या संभाजी पाटील, हिने 83:20हिने तृतीय क्रमांकाने यश संपादन केले. या वर्षी झालेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतुन एकूण 50 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते त्यात 47 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल94 टक्के लागला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक शाळेचे चेअरमन प्रभाकर पाटील यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.देवरे व सर्वोदय शाळेचे शिक्षक वृंद यांच्या कडून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल दहावीचा 100% निकाल.
प्रतिनिधी – एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत न्यु इंग्लिश मिडीयम स्कूलचा या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाने घेतलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक शाळेचे संचालक मंडळ व शाळेच्या प्राचार्या सरला कुलकर्णी उपप्राचार्य सरीता पाटील यांनी व सर्व शिक्षकवृंद शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे तसेच शाळेतून या वर्षी
32 विद्यार्थी परीक्षेत बसले होते व सर्व
पास झालेत तसेच
शाळेत प्रथम विद्यार्थी नाव पाटील हितेश दीपक 87.20 436 मार्क
तर द्वितीय- पवार सुमित भाऊसाहेब 85.80. 429 मार्क व पवार चैताली मोती 85.20. 426 मार्क
तृतीय – शिंपी राहुल सुभाष 85.20. 426 मार्क या विद्यार्थीनीं सारखे गुण संपादन केले आहेत.

*शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल चा निकाल* शास्त्री फौंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील वर्ष 2019-20 डी. फार्मसी चा निकाल 100 टक्के व बी.फार्मसी या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचा निकाल 96 टक्के लागला असून ग्रामीण भागातील मुला- मुलींनीच यावेळी सुद्धा बाजी मारली आहे. डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या बी. फार्मसीच्या प्रथम वर्ष मधील द्वितीय सत्र चा निकाल लागला असून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शैलजा माळी हिने 8.79 ग्रेड (CGPA) सह प्रथम क्रमांक मिळवला असून, सचिन शिंपी 8.57 ग्रेड (CGPA) सह द्वितीय व निकिता दांडे 8.53 ग्रेड (CGPA) सह तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच संस्थेतील इतर 54 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच डी. फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल लागला असून 48 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहे. नेहा सोनवणे (89.82%) व रोहित वाणी (89.82%) यांनी संयुक्त पणे प्रथम क्रमांक मिळवला असून कु. विजया धनगर (88.64%)हिने द्वितीय व सागर पाटील (87.46%)याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशा बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, प्रा. गोपीचंद भोई (उप. प्राचार्य), प्रा. जावेद शेख, प्रा. किरण पाटील, प्रा.अमृता चिंचोले, प्रा. हितेश कापडने, प्रा. राहुल बोरसे, प्रा. महेश पाटील, PRO शेखर बुंदेले , या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुध्दा अभिनंदन केले. सदरील यशासाठी प्रा. डॉ. शास्त्री यांनी सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले व प्राध्यापकांच्या केलेल्या मेहनती मुळेच विद्यार्थ्यांचा निकाल एवढा चांगला लागला असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशासाठी संस्थेतील सर्व शिक्षकवृंद यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

0