उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण ? भुसावळ करांना पाण्यापासून वंचित ठेवण्यास न.पा. तील सत्ताधाऱ्यांना अपयश – उमेश नेमाडे

भुसावळ – अशी गत झाली आहे सत्ताधाऱ्यांची मागील काळात आम्ही अनेक योजना आखल्या आणल्या त्यातीलच अमृत योजना , आम्ही योजनाबद्धआराखडा तयार करून शासनाला त्याचा प्रस्ताव पाठविला तो नुसता मंजूर झाला नाही तर महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा मंत्रालयाच्या सचिवांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांना भुसावळ नगरपालिकेच्या प्रस्तावा सारखा प्रस्ताव पाठवावा असे पत्र काढले.
अमृत योजना मंजूर झाली आणि नगर पालिका निवडणूक लागली आताचे सत्ताधारी तेव्हाचे विरोधी पक्षाच्या भूमिकेतून जिल्ह्यातील तसेच स्थानिक आमदार खासदाराच्या पाठबळाने आम्ही कोणतेही काम आखणी केली की थांबविण्याचे काम करीत होते कारण त्यांना सत्ता मिळवायची होती. निवडणुका झाल्या सत्ता मिळाली आणि मग जी योजना आम्ही तयार केली ती जर लागू केली तर मागील बॉडीला त्याचे श्रेय मिळेल या क्लिष्ट मनोवृत्ती ने ग्रासलेल्या आजच्या सत्ताधारी मंडळीने अमृत योजनेत फेरबदल करणे सुरू केले तापी नदीच्या पुलावर जाऊन एक बोट तिकडे दाखवत फोटो काढून मीडियात प्रिंटला देऊन आम्ही काही वेगळे करतोय हे दाखविण्याचा केविलवाणा प्रकार केला नागरिकांना त्या फोटो ची भुरळ पडली खरी ! झाला नव्याने प्रस्ताव तयार पूर्वीच्या प्रस्तावात नमूद हतनूर धरणा तून डारेक्ट पाइप लाइन द्वारे पाणी आणून शुध्दीकरण केंद्रात आणणे आणि ते अमृत वाहिण्यांद्वारे भुसावळ करांना देणे असे होते. कारण  कितीही दुष्काळ पडला तरी हतनूर मधील भुसावळ साठीच राखीव पाणी आपल्याला नियोजनपूर्वक देता येईल. भूमिपूजनाच्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबर2017 यादिवशी एक उच्चपदस्थ पदाधिकारी आपल्या भाषणात बोलले की ,ही योजना आधीच्या लोकांनी हतनूर मधून पाइप लाइन द्वारे पाणी आणणे अशी होती ,पण मी इंजिनिअर नगराध्यक्ष एम टेक शिकलो आहे त्यामुळे आम्ही पाहणी केली आणि ठरविले की नदीवर बंधारा बांधून त्यात पाणी अडवायचे झाले भूमिपूजन पण एवढे शिकलेले पदाधिकारी यांना केंद्र सरकारच्या नियमांची माहिती नसावी का ? ज्या वेळेस ते बोलले त्याच वेळेस मी बोललो होतो की हे होऊच शकत नाही कारण मला केंद्र सरकारच्या अधिसूचना (GR) बाबत अभ्यासपर्वक माहिती होती की ज्या नदी,  कालवा वा धरण यावरून दळण वळण होत असेल त्याच्या दोन्ही बाजूला 500 मीटर परिसरात बंधारा बांधता येत नाही. झाले तेच यांनी सुचविलेला बंधारा शासनाने नामंजूर केला.
योजना लांबली पर्यायी जागा शोधण्यात 18 महिने गेले. काम पूर्ण करण्याची मुदत आहे 30 महिने
त्यातही उलटे काम सुरू आहे जी पाइप लाइन टाकायची आहे ते काम प्रस्तावात शेवटचे आहे यांनी ते काम अर्थ कारणातून आणि डींग्या मारण्यासाठी पहिले सुरू केले सर्व गाव खोदून ठेवले आणि आज पावसाळ्यात नागरिकांना वेधीस धरले जाते आहे.
शेळगाव बॅरेज साठ्यातून पाणी उचलणार हा जो शेवटचा पर्याय मंजूर करणे सुरू आहे. हे सुध्दा योजनेतील निकषानुसार योग्य नाही याचा नगरपालिकेच्या दृष्टीने आर्थिक नुकसानीचे आहे. कारण पाण्याच्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पाण्याची उचल करू नये अशा सूचना योजनेचा प्रस्ताव तयार करतांना आहे. पण सत्ताधारी हे भुसावळ करांना मरण यातना भोगायला लावताय अजून दोन वर्ष अमृत पाइप लाइन टेस्टिंग होणार नाही तसेच अंडर ग्राउंड गटार होणार नाही तो पर्यंत रस्ते होणार नाही हे कितपत योग्य आहे, जो बोलेल त्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन अडचणी निर्माण करायच्या हेच सुडाचे राजकारण या शहरात सुरू आहे. शहर विकासाचे घोरण उराशी बाळगून अधीचाच प्रस्ताव कायम ठेऊन काम केले असते तर शहरवासीयांची पिळवणूक झाली नसती आणि आज जे प्रत्येकाला पाणी विकत घ्यावे लागले आणि अजून 2 वर्षे घ्यावे लागेल ती वेळ टळली असती सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याने त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
हतनूर मधून पाणी नगरपालिका वॉटरवर्कस मध्ये डायरेक्ट घेण्याचा पूर्वीचा प्रस्ताव कार्यान्वित करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

0