उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

चोपडा शहरात अरुणोदय कॉलनीतुन भरवस्तीमधून सोनसाखळी लंपास, शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

चोपडा(प्रतिनिधी) शहरातील अरुणोदय कॉलनी(प्लॉट नं १५) मधील उषादेवी भास्कर पाटील(६६) यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत मोटारसायकलवरील दोन अज्ञात तरुण चोरट्यांनी लंपास केली. सदर घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली .
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की ,दुपारी चार वाजेच्या सुमारास अरुणोदय कॉलनीमधील मधल्या गल्लीत मोटारसायकल स्वार दोन चोरटे आल्याने त्यांनी उषादेवी भास्कर पाटील या बंगडीवर बसल्या असता यहां बच्चों का स्कूल कहाँ है असे हिंदीवरून विचारले त्यांचे बोलणे समजत नसल्याने उषादेवी पाटील या गेटजवळ गेल्या असता मोटारसायकलवरील मागच्या चोरट्याने गेटमधून हात टाकून गळ्यातील सोनसाखळी लांबवली .आणि भरधाव वेगाने ते तिथून पसार झाले. अरुण नगरमार्गे वेगाने पसार झाल्याने ते सापडू शकले नाहीत .उषादेवी पाटील यांनी चोरट्यांना पाहिल्या नुसार ते गोरे गोमटे असून अंगावर काळे टी शर्ट आणि जीन्स पँट घालून स्पोर्टी शूज पायात होते.त्यांच्याकडील मोटारसायकलीचा रंगही काळसर असल्याचे त्या सांगतात. पन्नास हजार रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबविल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली. ऊषादेवी भास्कर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे .

0