कल्याण मुंबई सामाजिक

कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

प्रकाश संकपाळ / कल्याण
कल्याण- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धात्मक परिक्षासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समिती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन शिक्षणतज्ञ सतीश जाधव यांनी केले.
शिक्षणतज्ञ सतीश जाधव यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीं व त्यांच्या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून दिले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आयपीएस,आयएएस व तत्सम अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नव्या पिढीला विस्तृतपणे माहिती दिली.नाव कमावायचं असेल तर राजकीय नेता नाहीतर आयपीएस व आयएएस अधिकारी बना,जेणेकरून देशाची सेवा व स्वताच्या कुटुंबाला सुख समाधान  देण्याचे भाग्य आपणास लाभेल.
या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा भारती डाकवे यांनी केले होते,त्यांना मोलाची साथ जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांची लाभली.
माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश सचिव इरफान शेख,मुरबाड जिल्हाध्यक्षा नयना भोईर,चेतना रामचंद्रन आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महिला सेनेच्या प्रदेश सचिव उर्मिला तांबे,जिल्हाध्यक्षा स्वाती कदम,उपाध्यक्षा रेणुका शिरोडकर, वैभव केणे,जिल्हासचिव वासंती जाधव,कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे,अर्चना चिंदरकर, सुनंदा शिंदे,नगरसेविका तृप्ती भोईर,श्रेया भांबीड, सुरेखा महाजन,गीता काट्रप,शोभा रणबागळे, सुधा शहा,अविना केणे, माधुरी देवरे,कोमल राय, दीपाली कांबळे, सुरेखा जगताप, स्वप्नाली कदम,कपिल पवार,गणेश चौधरी, सचिन पोपलाईन,स्वप्नील सातवे,वैभव देसाई,महेंद्र कुंदरे, गणेश सोनावणे,गौरव जाधव,वृशाली वाडेकर,रोहन पवार,कौस्तुभ राजपूत तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्याचप्रमाणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक बातमीदार चे उपसंपादक प्रकाश संकपाळ, उपाध्यक्ष अंबादास भालेराव,ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ अण्णा पंडित,सुवर्णा कानवडे यांनी सहकार्य केले
0