अकोला विदर्भ

भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन करण्यासाठी तसेच यासाठी मूलनिवासी समाजाला  भारताचा शासनकर्ता बनविण्यासाठी  देशव्यापी महा जनजागरण अभियान सुरू 

अकोला — मूलनिवासी समाजाला  भारताचा शासनकर्ता बनविणे,भारतीय संविधान 100 टक्के लागू करणे व सामाजिक व आर्थिक समानता स्थापन करने यासाठी देशभरात पीपल्स पार्टी ऑफ इंडिया  (डेमोक्रेटिक ) च्या वतीने देशव्यापी महा जनजागरण अभियान म्हणून  येत्या  22 जुलै ला सकाळी11 ते 2 या वेळेत जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे सांस्कृतिक व प्रबोधनात्मक  कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आज स्थानीय हॉटेल रणजित येथे   पीपल्स पार्टी ऑफ इंडिया  राष्ट्रीय  अध्यक्षा (महिला विग ) इंजिनिअर नीलिमा भटकर , महाराष्ट्र अध्यक्ष  वसंत कोळंबे,अकोला जिल्हाध्यक्ष अरुण वानखडे, सचिव  ऍड नाना तायडे यांनी दिली
देशव्यापी महा जनजागरण अभियान  निमित्ताने अकोल्यात होत असलेल्या सभेच्या   अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय अध्यक्ष बी डी बोरकर हे असतील तर राष्ट्रीय  अध्यक्ष महिला विंग इंजि नीलिमा भटकर,उपाध्यक्ष के एस चौहान, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ मनीषा  बांगर, महाराष्ट्र प्रभारी  हरीश सहारे  यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे  देशाची वर्तमान स्थिती  खराब आहे कारण येथे संसदीय संस्थांवर अतिक्रमण झाले आहे, भारतीय संविधानावर आक्रमण केले आहे, यासोबतच प्रशासनावर  अतिक्रमण झालेले आहे ,सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाहीचा एक खांब असलेली न्याय पालिकेवरही अतिक्रमण करण्यात आले आहे या सर्वांवर ब्राम्हण वादी शक्तींचे आक्रमण झालेले आहे या सर्वांना मुक्त करण्यासाठी पीपल्स  पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने 1 जानेवारी 2019 पासून जन जागरण अभियान  सुरू केले आहे आणि हे अभियान वर्षभर चालविले जाणार आहे सर्वसामान्य जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार मिळणे, त्याचे संवर्धन करणे, आणि हे अधिकार देणारे भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी हे अभियान देशातील 400 जिल्हे आणि ग्रामपंचायत मध्ये एस सी,एस टी, ओ बी सी आणि धर्मांतरित अल्पसंख्याक, मूलनिवासी यांच्यासाठी राबविण्यात येत आहे या अभियानात सर्वांनी तन मन धनाने सामील होण्याचे आवाहन आज करण्यात आले आहे  यावेळी विनोद मेश्राम, प्रशांत मेश्राम,संतोष गणवीर, निखिल भोंडे, मायावती तायडे, दीक्षा मेश्राम  इंजि तनुजा नेपाळे, एस बी मगरे,सह अनेक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती
0