उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

मोबाईल चोरास अटक

भुसावळ प्रतिनिधी :- येथील शहर पोलीस स्टेशन  मधील मागील दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.स्थनिक गुन्हे शाखा यांनी सामंतर तपास करून आरोपीस अटक केली असून भुसावळ येथील शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 23/04/2019 रोजी भुसावळ पो स्टे ला गुरन 97/19 भादंवीक 395,  प्रमाणे अनोळखी 5 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास स्था.गु.शा.कडील तपास पथकाने समांतर तपास करून १), प्रमोद काशिनाथ पाटील रा.आकलुड ता.यावल २) गोविंदा पंढरीनाथ सपकाळे रा आंजला ता. यावल 3)विशाल आधार सपकाळे रा.पिंप्री ता.यावल 4)दिनेश सोमा भिल रा.आकलुड ता.यावल यांना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपी नं 1 यांच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे.

0