कल्याण मुंबई

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला बगल देेत  पर्यटकांचे नदि-धबधब्याच्या ठिकाणी गर्दी ; एकाचा खडवली नदीत बुडून मृत्यू

भिवंडी (अरूण पाटील) –जिल्हा अधिकारी ठाणे यांनी पूर्वीच पर्यटकांना नदी धबधब्याच्या ठिकाणी बंदी घातली असताना देखील काही अति उत्साही मंडळी आदेशाला बगल देत अशा ठिकाणी मुद्दामहून जात आहेत,अशाच प्रकारे येथील खडवली (भातसा) नदीवर पिकनिकसाठी गेलेल्या सुजान कृष्ण परब, प्रभादेवी (30) या इसमांचा रवीवारी दुपारी 3 च्या सुमारास बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू देह अद्याप सापडलेला नसून पोलीस स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने तपास घेत आहेत.

          सुजन कृष्णा परब,असे मृत एसमाचे नाव असू तो मूळचा सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील इनिवली गावचा रहिवासी असून तो नोकरीसाठी निमित्ताने मुंबईत आला होता. रूम नंबर 203 श्री को.औ.सोसायटी, सयानी रोड,प्रभादेवी मुंबई-25
येथील तो आपल्या 11 मित्रांसोबत रहात होता. हे सर्व मित्र मुंबईतील एका ज्वेलरीच्या दुकानात आर्टिफिशलचे काम करत आहेत. रविवारी सुट्टी असल्याकारणाने सकाळी आपल्या 11 मित्रासोबत सुजान पावसाळी पिकनिकसाठी खडवली येथील भासता नदीच्या पिकनिक पॉईंटवर आला होता. आपल्या मित्रांसोबत दुपारी दोन वाजेपर्यंत पिकनिकचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी सर्वांनी मद्यप्राशन देखील केले होते.
सुजन हा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात तो वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनी पाण्यात उडी घेतली. परंतू त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. इतर मित्रांनी वाचविण्यासाठी आरडा ओरडा केली पण तेवढ्यात तो खोल पाण्यात गेला आणी दिसेनासे झाला. या नंतर इतर मित्रांनी सायंकाळी चारच्या सुमारास खडवली पोलीस चौकीत धाव घेतली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक पोहणारे व्यक्तींना घेऊन उशीरा पर्यंत नदी पात्रात शोधाशोध केली, परंतु बुडालेल्या इसमांचा तपास काही लागला नाही. सोमवारी सकाळी कल्याण अग्निशमन दलाच्या पथकाद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहीती पोलीसा़नी दिली.
0