कल्याण मुंबई

अखेर खडवली भातसा नदीत बुडालेल्या सुजानचा मृत्य देह सापडला

भिवंडी, ( ‌‌‌‌‌‌‌‌‌‌ अरूण पाटील  )- मध्ये रेल्वेच्या कल्याण –कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानकापासून नजीक असलेल्या भातसा नदीवर पिकनिकसाठी आलेला सुजान कृष्ण परब, (30) हा तरुण रविवारी दुपारी ३ च्या सुमारास नादिच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य चालू होते पण मृतदेह सापडला नाही. सोमवारी पुन्हा तहसिलदार दिपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी अग्निशन दल आणि स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध घेत सोमवारी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान ओझर्ली गावच्या हद्दीत नदीपात्रात सदर मृतदेह जवळ जवळ 14 तासांनी सापडून आला आहे
मुळचा सिंधुदुर्ग सावंतवाडी येथील इनिवली गावचा रहिवासी असलेला सुजन कृष्णा परब हा युवक नोकरीसाठी मुंबईत आला होता. मुंबईच्या प्रभादेवी येथील सयानी रोड या ठिकाणी असलेल्या श्री को.औ.सोसायटी येथील आपल्या मित्रांसोबत तो सध्या राहत होता. हे सर्व मित्र मुंबईतील एका ज्वेलरीच्या दुकानात आर्टिफिशलचे काम करत आहेत. रविवारी सुट्टी असल्याकारणाने सकाळी 11च्या सुमारास आपल्या मित्रांसोबत सुजान पावसाळी पिकनिकसाठी खडवली येथील भासता नदीच्या पिकनिक पॉईंटवर आला होता.

            मित्रांसोबत दुपारी दोन वाजेपर्यंत पिकनिकचा आनंद लुटला. यावेळी सुजन हा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात तो वाहून जाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनी पाण्यात उडी घेतली. मात्र ते त्याला वाचवू शकले नाहीत. इतर मित्रांनी वाचविण्यासाठी आरडा ओरडा केला मात्र तोपर्यंत सुजन पाण्यात नाहीसा झाला. या नंतर इतर मित्रांनी रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास खडवली पोलीस चौकीत धाव घेतली
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक पोहणारे व्यक्तींना घेऊन उशीरा पर्यंत नदी पात्रात शोधाशोध केली, परंतु बुडालेल्या इसमांचा तपास काही लागला नाही. सोमवारी सकाळी कल्याण अग्निशमन दलाच्या पथकाद्वारे तसेच आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेला गोताखोर पुरवण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी सर्विसेस को-ऑप लि. संस्था यांच्या सहकार्याने पाणबुडीच्या साह्याने शोध मोहीम पुन्हा सुरू केल्यानंतर सायंकाळी ५:३० च्या दरम्यान सुजन याचा मृतदेह जवळ जवळ 14 तासांनी सापडला‌.                 शव विच्छेदनासाठी सुजानचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यावेळी खडवली नदीवरील घटनास्थळी कल्याण दिपक आकडे, नायब तहसीलदार अभिजीत खोले, टिटवाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी हजर होते.
0