विदर्भ

शेगांव मध्ये पिकविमा संदर्भात बैठक संपन्न

पिकविमा कंपनी म्हणजे जुगाराचा अड्डा – कैलास फाटे
शेगांव ( ) :- गेल्या 2018 च्या खरीप हंगामातील पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा  अध्याप मिळाला नाही. काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळाला तर तो सुध्दा प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी समान न देता त्यामध्ये भरपूर तफावत आहे. एका महसूल मंडळात शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा विमा काढला त्या पिकाला विमा वगळला अश्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचेकडे केल्या होत्या. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना घेऊन दि 24 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या दिवशी तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी विमा कंपनी अधिकारी तसेच पिकविमा संबंधित अधिकारी यांची मिटिंग घेण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने आज दि 23 जुलै रोजी जिल्हा कृषी अधिकारी नाईक, तहसीलदार शिल्पा बोबडे मॅडम, तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी, पिकविमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी वैभव तायडे व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अल्प संख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष मसुम शहा, तालुका अध्यक्ष अनिल मिरगे, गिरीधर देशमुख, प्रकाश पाटील, सरपंच अनंत शेळके, आर बी देशमुख हे प्रमुखपदी हजर होते.
दुष्काळ डिसेंबर महिन्यात जाहीर झाल्यानंतर आठ महिने झाले, दुसऱ्या खरीप हंगामातील पेरणी आटोपली तरी मागील विम्याचा मोबदला का मिळाला नाही? पिकविमा मोबदला देतांना ठरवलेली विमा सुरक्षा रक्कम विचारात घेतली का? गंभीर दुष्काळ असतांना प्रत्येक पिकाला विमा मोबदला का मिळत नाही? ज्या शेतकऱ्यांना मोबदला दिला त्या शेतकऱ्यांना एकाच महसूल मंडळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा कसा दिल्या जाते? पिकविमा कंपनी चे प्रत्येक तालुक्याला कार्यालय का नाही, शेतकऱ्यांनी कोणाकडे तक्रार द्यावी? ह्या व अनेक प्रश्नावर चर्चा झाली. काही प्रश्नांवर कृषी विभाग व विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक समोर आली त्यापैकी एक म्हणजे मनसगाव महसूल मंडळ मध्ये तीळ व तूर पिकलाच विमा मंजूर झाला. तीळ हे 80 दिवसाचे पिक आहे तर तूर हे 180 दिवसाचे पिक आहे. त्या कालावधी मध्ये येणारे मुंग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कपाशी सारख्या पिकाला का नाही? असा प्रश्न कैलास फाटे यांनी केला असता सर्व अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. त्यावेळी एक उदाहरण फाटे यांनी दिले की तुमच्याकडे तीन वाहन आहेत ( ट्रॅक्टर – कार – मोटारसायकल ) सर्व वाहन एकाच नावाचे व एकाच कंपनीचा विमा काढलेले आहेत. ते तीनही वाहने जळून खाक झाली तर कंपनीने फक्त मोटारसायकल चा विमा मोबदला दिला तर चालेल का? पिकविमा संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न केले असता अनेक प्रश्नाचे उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यातील निष्कर्ष एकच आहे की पिकविमा कंपनी हा जुगाराचा अड्डा आहे असा आरोप कैलास फाटे यांनी केला. करण मनसगाव महसूल मंडळात तिळाचा 14, तुरीचा 460, सोयाबीन चा 1630 तर कपाशीचा 1072 शेतकऱ्यांनी विमा काढला त्यापैकी वरली प्रमाणे कमी घर असणारे तीळ व तूर या पिकांनाच मजूर करणे म्हणजे हा जुगाराचा अड्डाच व्होय असे फाटे म्हणाले. त्यामुळे जिल्हाकृषी अधिकारी यांनी पुन्हा आठ दिवसांनी मिटिंग घेऊन प्रसन्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिनेश तांबटकर, गजानन राऊत, ओमप्रकाश राठी, विजय शेळके, मधुकर घोपे, गजानन विंचू, विशाल विंचू, रवी शेळके, सचिन देशमुख, संतोष जैस्वाल, श्रीकृष्ण शेळके, योगेश ढगे, मधुकर झाडोकार, नितीन फाटे, रमेश राजगुरे, गोपाल बुंदे, मंगेश हिंगणे, हरिष शेळके, संतोष उचाडे, प्रदीप बोळे, शे शब्बीर व शेकडो शेतकरी हजर होते.
0