अकोला विदर्भ

सत्तेच्या मस्तीत शेतक-यांची संस्था बरखास्त करणाÚया तथाकथीत नेत्याला विधानसभा निवडणुकीत जनताच सुरुंग लावेल – सभापती संतोष टाले

प्रशासक कृपलाणी हे फुंडकरांच्या ताटाखालील मांजर
खामगांव (प्रतिनिधी):-  शेतकरी,शेतमजुरासह सर्व घटकांना न्याय देणारी खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विदर्भात नावलौकीक आहे.आमदार आकाश फुंडकर यांनी राजकीय द्वेषापोटी बाजार समितीच्या संचालक मंडळाविरोधात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन खोटेनाटे आरोप लावुन अधिका-यांवर दबाव टाकुन खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात  आपली सर्व शक्ती पणाला लावली. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची केलेली ही कारवाई सत्तेचा दुरुपयोग करुन लोकशाहीची गळा घोटणारी आहे. सत्तेच्या मस्तीत शेतक-यांची संस्था बरखास्त करणा-या तथाकथीत नेत्याला जनता विधानसभा निवडणुकीत  सुरुंग लावेल अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष टाले यांनी दिली आहे.
दि.24 जुलै 2019 रोजी खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात आल्याच्या निर्णयानंतर सभापती संतोष टाले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,  2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक झाली. महाराष्ट्रात भाजप सत्तेत आली असतांना खामगांवात भाजपचा जनप्रतिनिधी असतांना भाजपने खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिंकण्याकरीता जंग-जंग पछाडले. साम-दाम-दंड भेद या नितीचा वापर करुन सर्व शक्ती पणाला लावुन देखील भाजपाला यश मिळाले नाही व खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काॅंग्रेस व मित्र पक्षाचा झेंडा फडकला.ती चिड व राग मनामध्ये ठेउन राजकीय द्वेषापोटी मागील 4 वर्षाच्या कालावधीत अनेक वेळा अधिका-यांच्या माध्यमातुन खोटेनाटे आरोप लावुन खामगांव कृ.उ.बा.स.बरखास्त करण्याचा खटाटोप सत्ताधारी भाजपच्या वतीने करण्यात आला.परंतू कायदेशीर बाजु मजबुत असल्यामुळे विरोधी सदैव तोंडघशी पडत गेले.परत कोणतेही ठोस कारण नसतांना अधिका-यावर दबाव टाकुन महाराष्ट कृषी खरेदी विक्री (विकास व नियमन ) अधिनियम 1993 चे कलम 95 अन्वये  खामगांव कृ.उ.बा.स.संचालक मंडळ जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या आदेशाने बरखास्त करुन बाजार समितीवर प्रशासक म्हणुन सहाय्यक निबंधक एम.ए.कृपलाणी यांची नियुक्ती केली आहे.
प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आलेले एम.ए.कृपलाणी हे आमदार फुंडकरांच्या ताटाखालील मांजर असल्यामुळेच त्यांची प्रशासक म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.त्यांच्यावर   पिटीशनच्या माध्यमातुन हायकोर्टामध्ये प्रकरण न्याय प्रविष्ट आहे असे असतांना त्यांची प्रशासक म्हणुन निवड करण्यात आली.
बाजार समितीच्या बरखास्ती विरोधात  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उच्च न्यायालयात दाद मागणार असुन न्यायालयावर आमचा पुर्ण विश्वास आहे. शेवटी विजय सत्याचाच होईल व लोकशाही पध्दतीने निवडुण आलेली शेतक-यांची संस्था बरखास्त करुन औट घटकेचा आसुरी आनंद घेणारे तोंडघशी पडतील असा विश्वास देखील सभापती संतोष टाले यांनी व्यक्त केला आहे.

0