कल्याण गुन्हा मुंबई

कामावरून काढण्याची धमकी देत महिलेवर कंपनी मालक, चालकाने केला बलात्कार

 भिवंडी,दि, २६( अरूण पाटील ) एका ‌नराधम कंपनीच्या मालकाने कामगार महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची

घटना समोर आली आहे. यात मुख्य म्हणजे   आरोपी मालकाच्या वाहन चालकानेही पीडितेवर बलात्कार केला असुन‌ या दोघा आरोपीं विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना हघ, भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका ते अंजुर फाटा  दरम्यान असलेल्या वळ पाडा  येथिल  महावीर कंपाऊंड मधील धाग्याच्या कंपनीत घडली.पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकासह त्याच्या वाहन चालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सुभाष गोपाळ मालुसरे (वय ४० वर्षे, रा. गौतम नगर, कुर्ला) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव तर संतोष जाधव उर्फ बाबू (वय ३५ वर्षे, रा. कुर्ला) असे चालकाचे नाव आहे.
             मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अंजुर गावात राहणारी असून ती आरोपी मालुसरे याच्या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वी नराधम कंपनीच्या मालकाने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिला कंपनीतील एका रूममध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर नराधम वाहनचालक बाबूनेही तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
           या दोघा नराधमांच्या वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडित महिला भयभीत झाली होती. अखेर पीडित महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल होताच दोघेही बलात्कारी फरार झाले असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण करत आहेत.

0