आंतरराष्ट्रीय

शिरपूर पिपल्स बँकेचा भोंगळ कारभार ; खातेदारांसह इतरांनाही होतोय त्रास

जळगाव :- शिरपूर पिपल्स को ऑप बँकेत सुमारे एक वर्षापासुन खाते असलेल्या सत्तार शबुद्दिन पिंजारी नामक ग्राहकाला एटीएम कार्ड मिळाण्यासाठी वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागत आहे. याबाबत त्याने आतापर्यत कितीतरी वेळा बँकेकडे तक्रार केली आहे. आवश्यक तो फॉर्मही दोनवेळा भरून दिला आहे. मात्र तरीही अद्याप या ग्राहकाला एटीएम देण्यात आलेले नाही. यामुळे या ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागत असुन यामुळे त्याने बँक कामकाजाबाबत संताप व्यक्त केला आहे.

सरकारी बँकांचे ग्राहक तेथील कारभाराला अगोदरच कंटाळले आहे. पण इतर खाजगी आणि को-ऑपरेटीव्ह बँकांची परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी नाही. ग्राहकांना साध्या-साध्या विषयांना घेऊन बँकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. पासबुक एंट्री, अनुदान, सबसिडी, शिष्यवृत्ती, एटीएम, धनादेशच्या अडचणी, अवाजवी रक्कम कपात होणे, कागदपत्रांचा त्रास इथपासून ते खात्याच्या सुरु आणि बंद करण्यापर्यतच्या कामकाजात बँक कर्मचारी आणि मॅनेजर ग्राहकांचा जिव घशापर्यत आणुन सोडतात. कर्ज प्रकरणासंदर्भात आलेल्या व्यक्तीला तर काही बँकांमध्ये अतिशय हीन वागणुक मिळते. बँकांच्या या मनमानीपणाला त्रासलेल्या ग्राहकांनी जायचं कुठे ? हा मोठा प्रश्न असतो. नुकताचं असाच एक प्रकार जळगावच्या विसनजी नगर येथे असलेल्या शिरपूर पिपल्स को-ऑप बँकेच्या संदर्भात समोर आला आहे.
सुमारे एक वर्षापासुन शिरपूर पिपल्स को-ऑप बँकेत खाते असलेल्या सत्तार शबुद्दिन पिंजारी यास एटीएम कार्ड मिळण्यासाठी वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागत आहे. याबाबत त्याने वारंवार बँकेकडे तक्रार केली तसेच दोनवेळा आवश्यक तो फॉर्मही भरून दिला आहे. मात्र तरीही अद्याप या ग्राहकाला एटीएम देण्यात आलेले नाही. यामुळे या ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागत असुन त्याने बँक कामकाजाबाबत संताप व्यक्त केला आहे. बँकेच्या अनियमित कामकाजामुळे त्याचे एटीएम त्याला मिळत नसल्याचाही आरोप त्याने केला आहे.

शिरपूर पिपल्स को-ऑप बँकेच्या इतरही काही ग्राहकांनी बातमीदार प्रतिनिधीशी बोलतांना धक्कादायक माहिती दिली आहे. दरम्यान ग्राहकांना हादरा देणारे काही गंभीर विषय देखील दै.बातमीदार प्रतिनिधी यांच्या निदर्शनास आले आहे. दै.बातमीदारने या प्रकरणाचा पुर्ण छडा लावण्याचा विडा हातात घेतला आहे. शिरपूर पिपल्स को-ऑप बँकेतील गैरप्रकाराबाबत आपल्याही काही तक्रारी असतील किंवा तुम्हीही बँकेच्या मनमानीला आणि जाचक त्रासाला कंटाळले असाल तर 9423973314 या क्रमांकावर संपर्क करून दै.बातमीदारला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

0