कल्याण गुन्हा मुंबई

भिवंडी महसुल खात्याची केमिकल गोदामानवर  कारवाई

,
भिवंडी ,(अरूण पाटील),तालुक्यात सर्वात जास्त बेकायदेशिर केमिकल गोदामे हि पुर्णा,राहाणाळ व वळ या ग्राम पंचायत हद्दित असुन या ठिकाणी वारंवार आगिच्या घटना घडत असल्याने या बेकायदेशिर केमिकल गोदामानवर महसुल खात्याने धडक सिल बंदची कारवाई सुरू केल्याने केमिकल गोदाम-चालकान मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे,
येथिल बेकायदेशि केमिकल गोदामानवर भिवंडीचे उपविभागिय अधिकारी(प्रांत) यानी नोटीसी
बजावल्या  होत्या, मात्र गोदामा चालक-मालकांनी गंभिरतेने न घेता नोटीसीना केराची टोपली दाखवली,मात्र त्यातच काहि दिवसा पुर्वी याच परिसरातील वळ ग्राम  पंचायत हद्दितील  प्रेरणा काॅम्पलॅक्स मधिल एका केमिकल गोदामाला आग लागुन  मोठी वित्त हाणी झाली  होती,मात्र सुदैवाने कोणतीही जिवित हाणी झाली न्हवती,परंतु आग  विझविन्यासाठी संपुर्ण शासकिय यंत्रणा कामाला लागली होती,त्या मुळे येथिल बेकायदेशिर गोदामानवर कारवाई करन्याचे आदेश प्रांत अधिका-यानी दिल्याने तहसिलदार श्री,शशिकांत गायकवाड यांच्या  मार्गगदर्शना खाली अप्पर मंडळ अधिकारी श्री चंद्रकांत राजपुत, तलाठी-पुर्णा श्री सुधाकर कामडी,तलाठी-वेहळे श्री,संजिव धात्रक,तलाठी जाधव,व महसुल  कर्मचा-यांनी येथिल पुर्णा ,राहाणाळ व वळ ग्राम पंचायत हद्दितील 36 केमिकल चालक -मालकांचे 68 केमिकल  गोदामे सिल केले असुन हि कारवाई संपुर्ण बेकायदेशिर केमिकल गोदामे सिल होई पर्यंत सुरू राहाणार असल्याची माहीती तलाठी पुर्णा श्री,कामडी यांनी प्रतिनीधी जवळ बोलताना दिली,
मात्र केलेल्या  कावाईतील गोदाम चालक-मालकांची  व गचदांमाची पुर्ण माहिती  देन्यास नकार दिला,या केमिकल सिल बंद कारवाईमुळे येथिल स्थानिक भुमी पुत्रांच्या उदर निरवाहचा प्रश्न उद्भवला आहे,कारण या केमिकल गोदामामुळे येथिल टेंपो  चालक-मालक,गोदाम चालक-मालक,व ईतर लघु व्यवसाय जोमात सुरू होते,परंतु या कायवाईमुळे येथे बेरोजगार वाढन्याची शक्यता वर्तवली जात आह,

0