उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

जळगावात हमाल मापाडी नेत्यासह एकावर चौघांचा प्राणघातक हल्ला

धुडकु सपकाळे यांची प्रकृती गंभीर ; माणसे पुरविण्याचा वाद उफाळला
जळगाव :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी नेते धुडकु सपकाळे यांच्यासह एकावर बुधवारी चौघांनी कारमधून येत तलवार आणि बॅटसह प्राणघातक हल्ला केल्याची घटना एमआयडीसी भागातील राका फर्निचर जवळ दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली असून धुडकु सपकाळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत माणसे पुरविण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेविका पती धुडकु सपकाळे हे बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास काशिनाथ लॉज चौकातून राका फर्निचर चौकात जात असताना टपरीवर थांबून गजानन देशमुख , संजय चव्हाण हे गप्पा मारत असताना अचानक कारमधून आलेल्या चौघांनी सपकाळे यांच्यावर नितीन सोनवणे,कोमेश सपकाळे , मयूर सपकाळे, भुरा कोळी आदींनी तलवार आणि लाकडी बॅटने हल्ला चढविलाअसल्याची माहिती जखमींनी दिली असून एमआयडीसी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे यांचा काही महिन्यांपूर्वी नितीन सोनवणे यांच्यासोबत माणसे पुरविण्यावरून वाद झाला होता. यावादातून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली .

0