उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

मुंबईत पावसाचा जोर कायम ; ४ एक्स्प्रेस गाडया रद्द

भुसावळ- मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून बुधवारी अप व डाऊन दोन्‍ही मार्गावरील  १२ एक्स्प्रेस गाड्‍यासह मुंबई जाणारी पॅसेंजर रद्द करण्यात रेल्वे प्रवाशांमध्‍ये संताप व्यक्त होत आहे. मुंबईतील पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने त्याचा वाहतुकीवर परीणाम झाला आहे.
भुसावळ विभागातून जाणार्‍या अप मार्गावरील चार तर डाऊन मार्गावरील आठ अशा एकूण १२ एक्स्प्रेससह अन्य अप ५११५४ मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. रद्द गाड्यांमध्ये अप १२१४२ पाटलीपूत्र-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस, अप ११०६२ दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस, अप १२५३३लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस, अप २२८६६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस तर
डाऊन ११०६७ लोकमान्य टिळक टर्मिनल्स फैजाबाद एक्स्प्रेस, डाऊन १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर-काशी एक्स्प्रेस, डाऊन  १२१६७डाउन-लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी एक्स्प्रेस, डाऊन २२२२१ मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, डाऊन १२१४७कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, डाऊन ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर-गोदान एक्सप्रेस, डाऊन  १२८७९लोकमान्य टिळक टर्मिनल्स भुवनेश्वर एक्स्प्रेस, डाऊन ११०५७ मुंबई-अमृतसर एक्स्प्रेसचा समावेश आहे.

उद्या रद्द गाड्यांमध्ये अप ११०२५ भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, अप १२१४८ निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस, डाऊन ११०२६पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, डाऊन २२८६५ लोकमान्य टिळक-पुरी टर्मिनल्स एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्‍या आहे.

0