उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

बनावट वाहनांच्या नोंदणी प्रकरणातील गुन्ह्याची परिवहन दक्षता समितीने घेतली माहिती

जळगाव ;- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ६ बनावट वाहनांच्या नोंदणी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती आज गुरुवार ८ रोजी अचानक परिवहन दक्षता समितीच्या पथकाने जाणून घेत गुन्ह्यासंबंधींचे कागदपत्रे हस्तगत केली असल्याची माहिती परिवहन खात्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , परिवहन विभागाचे सहाय्य्क पोलीस आयुक्त कार्यालयाचे दक्षता समितीचे प्रमुख प्र. प. कोलवडकर यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने आज परिवहन कार्यालयात येऊन  श्याम लोही यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. यावेळी पथकाला १० ट्रकांची बनावट नोंदणी   केल्याचे आढळून आल्याने या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दिनेशचंद्र कुलमते  या निलंबित परिवहन अधिकाऱ्याला मुख्य संशयित म्हणून अटक केली आहे. सध्या कुलमते हा कारागृहात आहे. तसेच या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी तस्लिमा खान अय्युब खान रा. पाळधी , शकील अहमद जब्बार , शेख फकीर शेख सांडू यांना अटक केली होती . अतित्वात नसलेल्या वाहनांची परस्पर नोंदणी केल्याचे या गुन्ह्यातून निष्पन्न  झाले आहे. तसेच यातील दोन वाहने परभणी आणि औरंगाबाद तर काही नंदुरबार येथील असल्याचे तपासात समोर आले आहे. या सहा गुन्हयांची माहिती तसेच कागदपत्रे ददक्षता समितीच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. या सहा गुन्ह्यातील अहवाल तयार करून तात्काळ वरिष्ठांकडे  पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

0