उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

ईश्वर कॉलनी परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून खून

जळगाव– ईश्वर कॉलनी परिसरातील साईबाबा मंदिराजवळ मध्यरात्री दगडाने ठेचून श्याम शांताराम दीक्षित यांचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष होते.
दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
सकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांमुळे ही घटना समोर आली आहे. याच परिसरात ते कुटुंबासह वास्तव्यास होते. मनसे कार्यकर्ते होते तसेच तहसीलमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. शाम दीक्षित हे ललित भाऊ कोल्हे यांचे निकटवर्तीय होते.
या गुन्ह्याच्या तपासासाठी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उप अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांसह ,एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा ताफा, डॉग स्कॉड घटनास्थळी आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रकिया सुरू असून आरोपी फरार झाले आहेत. आरोपीच्या तपासासाठी पोलीस पथक पाठविले असल्याचे समजते.

0