उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

कुंभार समाज मातीचा सन्मान करतो – ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव / धरणगाव –  भक्ती आणि कर्तव्याची शिकवण संत गोरोबा काकांच्या चरित्रातुन मिळते. मातीशी एकनिष्ठ राहणारा व मातीचा सन्मान करणारा कुंभार समाज हा गाव-गाड्याचा व जीवनाचा अविभाज्य अंग आहे. मातीशी एकरूप झालेल्या कुंभार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. कुंभार समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन व समाज मेळाव्याप्रसंगी पाळधी खु.येथे केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुंभार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना.गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व कुंभार समाज जिल्हा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.

सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
शासनाच्या मुलभूत सुविधेनतर्गत (२५१५) पाळधी खु. येथे कुंभार समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहाच्या बांधकामासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १५ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्य प्रतापराव पाटील,सरपंच चंद्रकांत माळी, उपसरपंच अनिल कासट, चंदन कळमकर,ए.पी .आय.एच .एल. गायकवाड, कुंभार जिल्हा महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी भिमराव कुंभार,विलास कुंभार, सुभाष कुंभार, धनराज शिरसाठ,अनिल पंडित,एकनाथ कुंभार, माजी सरपंच हेमंत पाटील,गोपाल कुंभार, ग्रा. पं. सदस्य शरीफ पटेल,सादिक पटेल,धर्मेंद्र कुंभार,भगवान कुंभार,शांतीलाल कुंभार,अजय कुंभार, राजू कुंभार,सुपडू कुंभार,भूषण माळी, गोपाल सोनवणे यांच्यासह तालुक्यातील कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत माळी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा सचिव सखाराम मोरे यांनी मानले.

0