उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा

समाजाचा इतिहास घराघरात पर्यंत पोहचविण्यासाठी गुर्जर समाज बांधवांनी प्रयत्न करावेत – डॉ एल डी चौधरी

गौरवकुमार गुर्जर / अमळनेर
समाजाचा इतिहास घराघरात पर्यंत पोहचविण्यासाठी गुर्जर समाज बांधवांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत डाॅ. एल डी चौधरी यांनी व्यक्त केले .अमळनेर दोडे गुर्जर बोर्डिंग येथे १० वा आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. चौधरी हे बोलत होते,
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा तृतीय तीथी ही धर्मरक्षक गुर्जर सम्राट चक्रवर्ती राजा मिहीर भोज गुर्जर यांची जयंती देशभरातील गुर्जर समाजातील गावागावात आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्याचे दहावे वर्ष असून रविवार दि.१ सप्टेंबरच्या भाद्रपद शुक्ल तृतीया चे निमित्त साधून अमळनेर दोडे गुर्जर बोर्डिंग भवनात आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष व विशस्त मंडळा कडून करण्यात आले होते. त्यात अमळनेर शहरातील गुर्जर बांधवांसह तालुक्यातील पाडळसरे, निम, कलाली, पढावद व तांदळी सह अमळनेर तालुक्यातील गुर्जर बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोर्डिंगचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार गुर्जर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष डॉ एल डी चौधरी, प्रा. डाॅक्टर धनंजय चौधरी, जेष्ठ नागरीक बळीराम दादा सुर्यवंशी, पंडित आबा गुर्जर, रमाकांत दामोदर चौधरी , अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मिडिया अध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील गुर्जर, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त अँड प्रकाश पाटील आदी होते.

यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर, सरदार वल्लभभाई पटेल व सरस्वती यांची प्रतिमापुजन करण्यात आले नंतर अँड प्रकाश पवार यांना महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांचा ही यथोचित सत्कार करण्यात आला. तर निम येथील जलमित्रांचे पाणी फाउंडेशन अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे प्रदेश शिक्षामंत्री प्रा. डाॅ. धनंजय चौधरी यांनी मिहीर भोज गुर्जर यांचा जिवन पट व इतिहासातील गुर्जर साम्राज्याची नोंदी विषद केल्या यावेळी राजेंद्र पवार,अमळनेर वकिल संघाचे अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड राजेंद्र चौधरी, नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी, अॅड पद्माकर पाटील, गुर्जर भवनाचे सचिव सी आर पाटील, पंडित आबा गुर्जर,मुख्याध्यापक समाधान पवार, वसंत नगर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डि एम पाटील, भारतीय सेना दलाचे जवान जितेंद्र पवार, समाजसेविका सौ. पुनम पवार, रणछोड पाटील, नीम सरपंच भास्कर चौधरी, कपिलेश्र्वर संस्थानचे सचिव मघन पाटील, ,डाॅ. महेश पाटील, इंजिनिअर दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील, प्रदीप चौधरी, श्रीराम पवार, विवेकानंद पवार, धनंजय पाटील, दिनेश पाटील, संदेश पाटील , गोपाल पाटील, सोपान पाटील, अरूण चव्हाण, एम एस पाटील, आर डी पाटील, नारायण चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव सी एस पाटील यांनी केले तर आभार वसंतराव पाटील गुर्जर यांनी व्यक्त केले.

1+