उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

चोपडा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस व मिहीर भोज जयंती साजरी

गुर्जर समाजाचा इतिहास सगळ्यासाठी प्रेरणादायी – गोरख तात्या पाटील

चोपडा- गुर्जर समाजाचा इतिहास सगळ्यासाठी प्रेरणादायी असून समाजातील उच्च शिक्षित युवकांनी संकुचित वृत्ती सोडून यशाची शिखरे गाठवीत असे आवाहन जि.प.चे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटिल यांनी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनानिमित्त चोपडा येथील कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
रविवार दि. १ सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल तृतीया निमित्त गुर्जर सम्राट चक्रवर्ती राजा मिहिर भोज जयंती व १० वा आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस मोठ्या उत्साहात व साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष इंजी. चंद्रशेखर पाटील,डॉ दीपक पाटील, जि. प. आरोग्य सभापती दिलीप पाटील, एम डब्लू पाटील,पं.स. सभापती एम व्ही पाटील आदी होते.
सुरुवातीला गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर व सरदार वल्लभभाई पटेल याची प्रतिमा पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी के डी आबा, आनंदराव पाटील, सेवा निवृत्त प्रा हेमंत पाटील, गरताडकर के पी तात्या यांचाही पुष्प देऊन छोटेखानी सत्कार करण्यात आला व राजा मिहिरभोज यांचेंबद्दल उत्कृष्ट असा इतिहास मुख्याध्यापक विलास पाटील यांनी सांगितला. समाज संगठन बद्दल डॉ दिपक पाटील तर समाज एकजुटीबद्दलचे फायदे दोडेगुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी मुद्देसूद मांडलेत.
कार्यक्रमास दिलीप पाटील,कांतीलाल पाटील,नंदकिशोर पाटील,ए डी गुर्जर, डॉ दीपक चौधरी,एम डब्ल्यू पाटील, रवींद्र बडगुजर ,एस एच पाटील, हिम्मत पाटील,दिपक पाटील, राजेंद्र देशमुख,चंद्रकांत पाटील,डॉ मनोज दादा,डॉ राहुल पाटील, अँड निर्मल देशमुख,आर सी पाटील,नरेंद्र चौधरी,संतोष पाटील, अनिरुद्ध चौधरी, विनायक चौधरी,जितेंद्र पाटील, व्ही पी चौधरी,तुषार पाटील,दोडे गुर्जर संस्थेचे विश्वस्त प्रवीण पाटील, सचिन पाटील,धनराज पाटील, सुभाष पाटील,राजू पाटील, डी बी पाटील, सुरेश हरी पाटील, डॉ अभिजित देशमुख, मनोज देशमुख,प्रदिप पाटील, भुषण महाजन,कन्या विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,व सरदार ग्रुपची तरुण मंडळी व दोडे गुर्ज,रेवे गुर्जर, सुरवंशी गुर्जर, बडगुजर आदी समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळींची उपस्थितीत कार्यक्रम झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चैताली कन्स्ट्रक्शनचे नितिन आबा चौधरी, मंगल बा पाटील, जे डी चौधरी, डॉ पवन पाटील, महेशबापु देशमुख यांनी प्रयत्न केलेत. एका फोनवर शाळेचे प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल अँड जी के पाटील याचेही आभार आयोजकांनी मानले. सूत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले तर महेश देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

1+