उत्तर महाराष्ट्र नंदुरबार सामाजिक

शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा

शिरपूर –  गुर्जर दिवस व गुर्जर सम्राट चक्रवर्ती राजा मिहीर भोज जयंती गुर्जर भुवन शिरपूर येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.
रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिर भोज जयंती निमित्त सर्व गुर्जर बांधुनी पुष्पार्पण करून दर वर्षी प्रमाणे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिर भोज जयंती निमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य जी.वो पाटील सर यांनी आपले विचार मांडलेत. अखिल भारतीय गुर्जर परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.शातांराम महाजन व प्रमोदभाई गुर्जर यांनी आपले विचार मांडलेत व अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह गुर्जर यांनी आभार मानलेत. यावेळी बडगुर्जर समाजाचे अध्यक्ष डॉ अतुल बडगुर्जर, तारांचंदजी बडगुर्जर ,डॉ मनोज गोड,छगन गुर्जर, प्रा.व्ही.बी.पाटील, राजेद्र गुर्जर, वरूणगुर्जर, सुर्यकान्त गुर्जर,अरूण पाटील, प्रमोद सोमजी पटेलवाडी,योगराज गुर्जर,संजय शंकर पटेल, अविऩाश पटेल, संजय नागीण पटेल, रोशन शंकर पटेल सर्व गुर्जर बांधवांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

छायाचित्र- आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनानिमित्त प्राचार्य जी ओ पाटील,विजयसिंह गुर्जर, अँड शांताराम गुर्जर आदी गुर्जर बांधव उपस्थित होते.

0