उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

बोदवडला लोक अदालत व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर संपन्न

बोदवड – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता लोकअदालत व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एस .डी. गरड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती ॲड अर्जुन टी पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, नायब तहसीलदार पुसेकर,गटविकास अधिकारी वाघ, पंच गजानन बळीराम चौधरी हे उपस्थित होते.

महिलांवर होणार्‍या ऍसिड हल्ल्याबाबत कायदेविषयक मनोगत नायब तहसीलदार पिसेकर ,अँड मीनल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. के. इंगळे यांनी केले.

लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी पक्षकारांनी ,गरजूंनी लाभ घ्यावा. तसेच आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये सामोपचाराने मिटवावी. व आपल्या वेळेची व पैशांची बचत करावी असे आवाहन अँड.अर्जुन पाटील यांनी लोक अदालतीचे महत्त्व याविषयी मार्गर्शन करतांना केले.

दि. 18 सप्टेंबर 2019 रोजी होणाऱ्या फिरत्या लोक अदालतीचे आयोजन ( फिरती मोबाईल व्हॅन ) बोदवड न्यायालयात केलेले आहे. फिरत्या लोक अदालत चा व सदर दिवशी होणाऱ्या मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजूंनी घ्यावा असे आवाहन न्यायाधीश गरड यांनी केले आहे.
या लोक अदालतीमध्ये एकूण 75 प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी फौजदारी एक व दिवाणी दोन प्रकरणांमध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड मोझे, सरकारी वकील नवाब शेख , अँड अमोल परदेसी, अँड शारदा राऊत ,अँड सौ तेजस्विनी काटकर ,अँड विजय मंगळकर ,अँड निलेश लढे,अँड. डी सी प्रजापती, अमोल सिंग पाटील.तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्ग तहसील कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर बोदवड व तालुका परिसरातील मोठ्या प्रमाणावर पक्षकार, व नागरिक , सेंट्रल बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0