उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

दर्जीच्या भूषण पाटीलची सीआयएसएफ मध्ये निवड

 जळगाव – येथील दर्जी फाउंडेशनच्या भूषण पाटील या विद्यार्थ्यांची सीआयएसएफ मध्ये कॉन्स्टेबल पदी यशस्वी निवड झालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात अलीकडेच भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी आणि लेखी प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. या निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात दर्जी फाउंडेशनच्या भूषण अशोक पाटील याने यशस्वी बाजी मारली.
नंदुरबार जिल्ह्यातील खर्दे या छोट्याशा
खेड्यातील सामान्य कुटुंबातील भूषण पाटील हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शासकीय सेवेत निवड व्हावी यासाठी त्याने दर्जी फाउंडेशनचे मार्गदर्शन घेतले. या मार्गदर्शनाचा त्याला लाभ झाल्यामुळे
त्याची यशस्वी निवड झाली आहे. या यशाबद्दल दर्जी फाउंडेशनच्या संचालिका सौ. ज्योती दर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील गरजू उमेदवारास शासकीय नोकरी मिळाल्याचा आनंद फार मोठा असतो कारण किमान दहावी उत्तीर्ण असला तरी कठोर मेहनत घेतली तर उमेदवार यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच गरजू उमेदवारांनी यासारख्या पदांचे फॉर्म भरून नामांकित व विश्वसनीय संस्थेचे मार्गदर्शन घेऊन यश मिळवावे असे मत सौ. ज्योती दर्जी यांनी व्यक्त केले.
0