उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

शासनाच्या सी.एस.आर. फंड योजने अंतर्गत फक्त ४०० रुपयांत विविध कोर्सेस

रावेर – शासनाच्या सी.एस.आर. फंड योजने अंतर्गत ‘शिवणकाम, ब्युटी पार्लर, टॅली, एम.एस. ऑफिस’ प्रशिक्षण व उद्योग मंत्रालयाचे प्रमाणपत्र फक्त ४०० रुपयात.सी.एस.आर. फंड योजने अंतर्गत सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी ‘शिवणकाम, ब्युटी पार्लर, व पुरुष /महिलांसाठी टॅली, एम.एस. ऑफिस’प्रशिक्षण व उद्योग मंत्रालयाचे प्रमाणपत्र फक्त ४०० रुपयात रावेर येथे आयोजित केलेले आहे. त्या साठी उमेदवाराचे वय १८ ते ४५ च्या दरम्यान असावे. शिक्षणकिमान १० वी पास असावे. उमेदवाराने जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, आधार कार्ड च्या पहिल्या पानाची छायाप्रत व १ फोटोसह

वक्रांगी केंद्र ATM

 

गाळा क्रमांक १२ व १३, शेतमाल संस्था कॉम्प्लेक्स, यशवंत विद्यालय समोर,

 

नवीन तहसिल आॅफिस जवळ, स्टेशन रोड, रावेर, जिल्हा जळगाव. फोन नं.  २५८४-२५००३० येथे दि.6 सप्टेंबर पूर्वी अर्ज भरून द्यावा. अर्ज व कागदपत्रांची छाननी नंतर ५० उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे द्वारे करण्यात येईल. ज्या उमेदवारांची निवड होईलत्यांना एस.एम.एस. द्वारे कळवण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण रावेर येथे घेण्यात येईल. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय चे प्रमाणपत्र मिळेल. तरी इच्छुक उमेदवारांनी योजनेचा लाभ घ्यावा असे रावेर तालुका समन्वयक विजय पाटील (मो.न.९९२२२२६१२४, ८७८८७७९६७३) यांनी कळविले आहे.

0