उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

सार्वजनिक जागी विना परवाना दारू विकणाऱ्या दोघांवर कारवाई

भुसावळ प्रतिनिधी :- येथील जामनेर रोड भिरुड हॉस्पिटल जवळ सार्व.जागी दि 1.10.2019 रोजी रात्री 9:00 वा.सुमारास तसेच पापानगर भागात आरोपीच्या घरासमोर सार्व.जागी दि 2.10.2019 रोजी रात्री 8 :15 वा सुमारास सार्वजनिक जागी विना परवाना दारू विकणाऱ्या दोघांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या दोन्ही ठिकानी एक-एक इसम विना परवाना देशी विदेशी दारु कबज्यात बागळुन तिची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने मा.पो. अधिक्षक श्री पंजाबराव उगले जळगाव मा. अप्पर.पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके जळगाव
मा.उप.पो.अधिकारी श्री गजानन राठोड  भुसावळ
मा.पो.निरीक्षक सो श्री दिलीप भागवत सर भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शनाखाली भु.बा.पेठ पो.स्टे चे पो.हे.काँ सुनिल जोशी, शंकर पाटील पो.ना.रमण सुरळकर पो.काँ कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव अश्यांनी लागलीच त्या दोन्ही ठिकानी जावुन त्यास ताब्यात घेतले त्यांचे नाव गाव विचारले असता त्यातील एकाने त्यांचे नाव
1) दिपक सुरेश चौधरी वय-39 रा.दिनदयाल नगर भुसावळ असे सांगितले यांच्या ताब्यात
1) 700/- रु.कि.च्या इंम्पेरीयल बल्यु कं.च्या 5 बाटल्या
2) 420/- रु.कि.च्या ओल्डमंक कं.च्या 3 बाटल्या
3) 780/- रु.कि.च्या आँफिसर चाँईस कं.च्या 6 बाटल्या असा एकुण 1900/- रु.कि.च्या माल मिळाल्याने तसेच दुस-या ठिकानी 2) शेख सलीम शेख हमीद वय-53 रा.पापानगर भुसावळ असे सांगितले व यांच्या ताब्यात
1) 624 /- रु.कि.च्या देशी टँगो पंच कं.च्या 12 बाटल्या मिळाल्याने या दोन्ही ईसमांनवर भु.बा.पेठ पो.स्टे ला प्रोव्हीशन गु.र.न 449/2019 व /2019 मु.प्रो.अँक्ट क.65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन एका गुन्हयाचा तपास पो.ना.रमण सुरळकर व दुस-या गुन्हयाचा तपास पो.हे.काँ सुनिल जोशी करीत आहे.

0