उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

चाकूचा धाकावर दिव्याग युवतीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी :- येथील मुस्लिम कॉलनी मधील युवकाने चाकूचा धाकावर दिव्याग युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सुरत (गुजरात)मधून बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग 5 गुरन 0493/2019 भा द वि कलम-376(1),376,2(1) तसेच लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधि.कलम-4,6,12 प्रमाणे दिनांक 01.10.2019 रोजी 19.14 वाजता गुन्हा दाखल आहे.
भुसावळ मध्ये नवीन ईद गा जवळ 17 वर्षी दिव्याग अल्पवयीन युवती वर यातील  आरोपी अमीन शेख याने  चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केले होते.
सदर गुन्हातील फरार आरोपी नामे शेख अमीन शेख अकिल शेख वय-27 रा. मुस्लिम कॉलनी भुसावळ याची मा.पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती भेटली की सदर आरोपी सुरत मध्ये असल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ. पंजाबराव उगले जळगाव यांच्या परवानगी ने तपास पथक तयार करून सुरत येथे रवाना झाले होतो तरी सदर फरार आरोपी याचा सुरत crime branch च्या कर्मचारीच्या मदतीने आरोपी म यास सुरत शहरातून मिठी खाडी भागातून सापडा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ पंजाबराव उगले व मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके जळगाव तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजाजन राठोड व मा.पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रमण सुरळकर, पो.काॅ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव अशांनी केली आहे.

0