उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्याला अटक

भुसावळ प्रतिनिधी :- शहरात टि.व्ही.टाँवर समोर असलेल्या मैंदाना जवळ सार्व.जागी दि 4.10.2019 रोजी 12:50 वा.सुमारास भुसावळ एक इसम त्याच्या कबज्यात अवैध रित्या गावठी बनावटीचे पिस्टल ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने मा.पो.अधिक्षक श्री पंजाबराव उगले  जळगाव मा.अप्पर.पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके जळगाव मा.उप.पो.अधिकारी श्री गजानन राठोड  भुसावळ मा.पो.निरीक्षक श्री दिलीप भागवत भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शनाखाली भु.बा.पेठ पो.स्टे चे पो.उप.नि.सारीका कोळपकर पो.हे.काँ शंकर पाटील पो.ना.दिपक जाधव,यासिन पिंजारी पो.काँ कृष्णा देशमुख,उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी अश्यांनी लागलीच तेथे जावुन अतिशय हुशार पध्दतीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव उमेश कडु बाणाईत वय-24 रा.गणेशपुरी केळकर हास्पिटल जवळ भुसावळ असे सांगितले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला गावठी पिस्टल मिळाले ते खालील प्रमाणे  5,000 /- रु.कि. चा एक गावठी पिस्टल,1000 /- रु.कि.चे दोन जिवंत काडतुस प्रत्येकी 500/- रु एकुण 6,000/- रु असे मिळुन आल्याने त्यावर भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग 6 गु.र.न 500/2019 आर्म अँक्ट 3/25 मु.पो.अँक्ट कलम 37 (1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास पो.हे.काँ शंकर पाटील करीत आहे.

0