अकोला विदर्भ

जळगाव जामोद मतदार संघात परिवर्तनाची लाट.. डॉक्टर स्वाती वाकेकर यांना मिळत आहे वाढता पाठिंबा

जळगाव जा. (प्रतीनिधी) –  जळगाव जामोद मतदारसंघात या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून आपल्या मूळ दुभाषी स्वभावामुळे काँग्रेसच्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दृश्य मतदार संघाचा फेरफटका मारला असताना दिसून येत आहे. पूर्वीच्या जलंब व आताच्या जळगाव जामोद मतदारसंघ मध्ये डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांचे वडील कृष्णराव इंगळे यांनी याच मतदारसंघात तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता कृष्णराव इंगळे यांनी आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी जळगाव जामोद नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्य केले होते त्यावेळेस राजकीय क्षेत्रात अगदी नवखे असलेले कृष्णराव इंगळे यांनी दहा वर्ष आमदार असलेल्या डॉक्टर श्रद्धा ताई टापरे यांचा पराभव केला होता जळगाव जामोद मतदारसंघात योगायोगाने यावेळेस इतिहासाची पुनरावृत्ती होत असताना दिसत आहे जळगाव जामोद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविलेल्या डॉक्टर सौ स्वाती ताई वाकेकर ह्या राजकीय क्षेत्रात अगदी त्यांच्या वडीला प्रमाणेच नवख्या उमेदवार आहेत व त्यांची लढत बलाढ्य उमेदवार असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांचेशी असून या वेळेत बदललेल्या परिस्थितीचा त्यांना निश्चितच लाभ मिळताना दिसत आहे जळगाव जामोद मतदारसंघात इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास नवल वाटू नये एवढे मात्र निश्चित….
0