अकोला विदर्भ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात स्वातीताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय

शेगाव: जळगाव जामोद मतदारसंघात महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचा उमेदवार नसल्याने मनसे पदाधिकारी मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वाती ताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेगाव शहर व तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्थानिक खामगाव रोडवर असलेल्या वर्धमान भवन येथे आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार च्या मागील पाच वर्षात चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र बकाल झाला असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढ झाली आहे महाराष्ट्र वर कर्जाचा डोंगर झाला असून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे जळगाव जामोद मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल अश्या बलाढ्य उच्चशिक्षित व सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची क्षमता असलेल्या उमेदवार म्हणून डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला यावेळी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष विनोद टिकार मनसे तालुकाध्यक्ष रवींद्र उन्हाळे शहराध्यक्ष अमित देशमुख ज्येष्ठ नेते नारायण शेगोकार रामा इंगळे राहुल धनोकार प्रशांत वाडकर मुरली खरप गोपाळ लांजुळकर भगवान मोठे मनीष ज्याने महेंद्र शेगोकार संतोष भटकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
0