उत्तर महाराष्ट्र जळगांव

जळगाव मेडिकल डीलर्स असोशिएशन तर्फे महायुतीचे उमेदवार आ.  सुरेश भोळे (राजूमामा) यांना पाठींबा

जळगाव  – भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय, (A) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार यांना अनेक संघटना, समाज यांच्या कडून मोठ्या संख्येने जाहीर पाठींबे मिळत असून   दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी जळगाव मेडिकल डीलर्स असोशिएशनच्या वतीने मा. सुनील भाऊ भंगाळे व सर्व असोशिएशन पदाधिकारी यांनी महायुतीच्या उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केले.

या बैठकी प्रसंगी माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे, ललित भैया चौधरी, अनिल झंवर, कनकमल रांका, संजय नारखेडे, नगरसेवक महेश चौधरी हे मंचावर प्रमुख उपस्थित होते.

सदर बैठकीला खालिद भाई, इलियास बागवान, रुपेश चौधरी, ब्रिजेश जैन, दिनेश मालू, मनीष अत्तरदे, पंकज पाटील, दीपक चौधरी, रवींद्र वऱ्हाडे, संजय तिवारी, अमित चांदीवाल यासह असंख्य केमिस्ट बांधव हजारोच्या संख्याने उपस्थित होते.

0