उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

रावेरातून चोरीस गेलेला ट्रक मध्यप्रदेशात पकडला

चार जणांच्या मुसक्या आवळल्या
रावेर;- येथील शे. एजाज शे. फयाज यांचा ट्रक २७ सप्टेंबर २०१९ रोजी चोरीस गेला होता. तो ट्रक रावेर पोलीसांनी मध्यप्रदेश येथून हस्तगत केला असून चौघांना अटक करून ट्रक मालकाला ट्रकची चावी देण्यात आली.

सविस्तर वृत्त , शे. एजाज शे. फयाज यांचा दहा चाकी ट्रक (क्र. एम. एच. १९ सी. वाय.२६०३) २७ सप्टेंबर २०१९ रोजी रावेर शहरातून सावदारोड, महाजन हॉस्पिटल समोरून रात्री चोरीस गेला होता. ट्रक मालक यांना हा चोरीला गेलेला ट्रक आपणाला पुन्हा मिळणार नाही असे वाटत होते. त्यांनी पै पै पैसे गोळा करून ट्रक विकत घेतला होता. मात्र तो चोरीस गेल्याने ते फार दुखी झाले होते. त्यांनी यासंदर्भात रावेर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. पो. नि. रामदास वाकोडो यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सतिष सानप, पो.कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ. तुषार मोरे यांनी तपासाची चक्र फिरविले व ट्रक किशनगंज महू मध्यप्रदेश येथुन हस्तगत केला. यात इंदौर येथील रहिवासी नवाब आता मोहमद पिंजारी , सलीमशहा रमजान सहा, अकील मो नबी मो, हितेंद्र कैलास धारेकर या चौघांना त्यांनी अटक केली. कोर्टच्या आदेशानुसार हस्तगत केलेला ट्रकची चावी शे. एजाज शे. फयाज यांना पो. नि. रामदास वाकोडे यांनी दिली.

0