उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव ;– शहरातील शिवाजीनगर येथील वीस वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तीन दिवसांपूर्वी योगिता किसन गाडे वय 20 रा. शिवाजी नगर प्रूसती होवून तिने मुलीला जन्म दिला आहे. बाळावरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवाजीनगर परिसरात किसन विष्णू गाडे हे पत्नी योगिता, भाऊ विष्णू, वडील विष्णू भानुदास गाडे व आई इंदुबाई याच्यासोबत वास्तव्यास आहे. चार वर्षापूर्वी त्यांचा योगीता हिच्या सोबत विवाह झाला. योगीता आठ महिन्याची गरोदर असल्याने तिची प्रकृती बिघडली. तिला गुरुवारी सहयोग क्रिटीकल केअरला येथे हलविण्यात आले. याठिकाणी मुलीला जन्म दिला. योगीतावर उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी प्रकृती अधिकच खालावल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी रात्री 10.30 वाजेदरम्यान तिची अखेर मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. व तिची प्राणज्योत मालवली.

तिच्या बाळावरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. याठिकाणी पती किसन याच्यासह कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. यानंतर करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

0